Photo Credit- X

Mohamed Muizzu to Visit India Soon: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू (Maldive President Mohamed Muizzu)लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्या प्रवक्त्यांना माहिती दिली. त्यानुसार मुइझू (Mohamed Muizzu)हे 10 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (PM Modi)अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल जानेवारीमध्ये निलंबित करण्यात आलेल्या दोन मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला त्याच दिवशी प्रवक्त्या हीना वलीद यांनी मुइज्जू यांच्या भारत भेटीची घोषणा केली होती. (हेही वाचा: Maldives to Hold Road Shows in India: अखेर मालदीवने घेतले झुकते माप; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतामध्ये करणार रोडशोज- Reports)

सन या ऑनलाइन न्यूज पोर्टले दिलेल्या वृत्तानुसार, हीना वलीद यांनी म्हटले की, या भेटीची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर अशा तारखेबाबत दोन्ही पक्ष चर्चा करत आहेत. पत्रकार परिषदेत हीना वलीद यांनी म्हटले की, “राष्ट्रपती लवकरच भारत दौऱ्यावर असणार आहेत. अशा भेटी दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर अशा वेळी आयोजित केल्या जातात. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जाणारे मोहम्मद मुइझू हे 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीत उपस्थित होते.

मुइझ्झू यांची पहिली भेट तुर्कीची होती त्यानंतर त्यांनी जानेवारीमध्ये चीनचा दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून आनंद झाल्याचे मुइझू यांनी तेव्हा सांगितले होते. मुइझ्झू यांनी मायदेशी परतल्यानंतर त्यांची पहिली भारत भेट मालदीव आणि प्रदेशासाठी 'यशस्वी' असल्याचे वर्णन केले होते. दोन्ही देशांमधील मजबूत संबंध मालदीवच्या लोकांसाठी समृद्धीकडे नेतील असे त्यांनी म्हटले होते.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ऑगस्टमध्ये मालदीवला गेले होते. मुइझ्झू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर भारताचे मालदीवशी संबंध तणावपूर्ण झाले. त्यांच्या शपथविधीच्या काही तासांतच त्यांनी मालदीवला भारताने भेट दिलेल्या तीन विमान वाहतूक प्लॅटफॉर्मवर तैनात केलेल्या भारतीय लष्करी जवानांना परत जाण्यास सांगितले होते. दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर भारतीय लष्करी जवानांची जागा तेथील कर्मचाऱ्यांनी घेतली होती.

मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या मंत्र्यांच्या टिप्पण्यांना वैयक्तिक ठरवत प्रशासनाला त्यांपासून दूर केले होते. मालदीव सरकारच्या त्या मंत्र्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत असे ट्विट करण्यात आले होते.