Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीची संध्याकाळी मातोश्रीवर बैठक; उद्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता
Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक होणार आहे. कदाचीत ही अंतिम बैठक ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray)यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर या बैठकीचं आयोजनक करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीकडून पक्षाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजप(BJP)कडून त्यांच्या उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यात येत आहेत. कदाचीत उद्या उद्धव ठाकरे त्यांच्या उमेदवरांची यादी जाहीर करू शकतात. (हेही वाचा:Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील मतदानाबाबतची अधिसूचना आज होणार जारी )

कदाचीत शिवसेना त्यांच्या पहिल्या यादीत रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या जागांवरील त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. यासह छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरही आजच्या बैठकीत चर्चाकरून शिवसेना आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो. (हेही वाचा :Nitin Gadkari On Loksabha Election 2024: 'मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन'; नितीन गडकरी यांचा दावा )

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला जागावाटपावर ठोस तोडगा काढता येत नव्हता. मात्र, चर्चांचसत्र अजून कायम आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. मविआमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 26 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.