Nitin Gadkari (फोटो सौजन्य - फेसबुक)

Nitin Gadkari On Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप (BJP) सह विरोधी पक्षांतील नेते निवडणूक जिंकण्याचा दावा करत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभा निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन, असा विश्वास व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना नितिन गडकरी म्हणाले की, 'तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केले आहे, देशात मी जे काही काम करू शकलो ते तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे. त्याचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला जाते. मी नागपूरला कधीच विसरलो नाही आणि कधीच विसरणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून जे काही काम करता आले, ते मी केलं. मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन.'

नितिन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या 10 वर्षात मी नागपुरात 1 लाख कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, हे एक न्यूजरील आहे. खरा चित्रपट अजून सुरू व्हायचा आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी नागपूरला जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये नेईन. माझ्या राजकीय वारशावर भाजप कार्यकर्त्यांचा हक्क आहे, असंही गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Nitin Gadkari On Asembly Polls 2023: 5 पैकी किती राज्यात भाजप जिंकणार? नितीन गडकरींनी सांगितली भविष्यवाणी)

माझा कोणताही मुलगा राजकारणात नाही. मी माझ्या मुलांना सांगितले की, त्यांना राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी आधी भिंतींवर पोस्टर चिकटवावे आणि जमिनीवर काम करावे. माझ्या राजकीय वारशावर भाजप कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. तथापी, भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. (हेही वाचा - Nitin Gadkari On Maharashtra Politics: राज्यातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी म्हणाले, 'ज्यांना मंत्रीपद हवे आहे ते आता दुःखी आहेत कारण...')

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत चार याद्या जाहीर केल्या असून त्यात 291 पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभेच्या 543  जागांसाठीची निवडणूक 19 एप्रिलपासून निवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास 97 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. 1 जून रोजी संपणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी त्यांच्या प्राथमिक याद्या जाहीर केल्या आहेत. एनडीएने लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.