Nitin Gadkari On Asembly Polls 2023: 5 पैकी किती राज्यात भाजप जिंकणार? नितीन गडकरींनी सांगितली भविष्यवाणी
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

Nitin Gadkari On Asembly Polls 2023: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मिझोरममध्ये निवडणुका संपल्या आहेत, तर छत्तीसगडमध्ये मतदानाचा एक टप्पा पार पडला आहे. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणे बाकी आहे. यासोबतच छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. अशातच आता भारतीय जनता पक्ष (भाजप) पाचपैकी तीन राज्यात नक्कीच विजयी होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपुरात केला.

मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मला विश्वास आहे की, पाचपैकी तीन राज्यात आम्ही विजयी होऊ. मिझोराममध्ये आमच्या जागांची संख्या वाढेल. तेलंगणामध्ये भाजप जिंकणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचाच विजय होईल, असा माझा विश्वास आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे 20 वर्षांचे चांगले काम आणि मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांमुळे आम्हाला मध्य प्रदेशात विजय मिळणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. (हेही वाचा -Show-Cause notice to Priyanka Gandhi Vadra: 'PM Narendra Modi यांचा प्रियंका गांधींच्या वक्तव्यामुळे अपमान', BJP च्या तक्रारीवरून Election Commission कडून प्रियंका गांधींना नोटीस)

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन दिवसांनंतर 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोरामसह छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. याशिवाय राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत नितीन गडकरी म्हणाले की, ही इतकी मोठी उपलब्धी आहे, ज्याचा इतिहास आपण कधीही विसरू शकत नाही. मी स्वतः अयोध्येतील राममंदिर आंदोलनाचा भाग राहिलो आहे आणि तुरुंगातही गेलो होतो. प्रभू राम हे आपल्या इतिहासाचे, वारशाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत.