Lok Sabha Elections 2019: यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वाड्रा ( Robert Vadra) यांच्या नावाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत देणारी एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासांमध्येच उत्तर प्रदेश येथील मुरादाबाद जिल्ह्यात रॉबर्ट वाड्रा यांच्या स्वागताची पोस्टर्स झळकली आहेत. ही पोस्टर्स मुरादाबाद युवक काँग्रेसने लावल्याची माहिती आहे. पोस्टरवर सरळ सरळ संदेश दिसत आहे की, 'रॉबर्ट वाड्रा जी आपण मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढा. आपले स्वागत आहे.'
रॉबर्ट वाड्रा यांनी एक दिवसापूर्वीच आपल्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, विस्तारीत पातळीवर लोकांची सेवा करण्यासाठी मी तयार आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, अनेक महिने आणि वर्षे लोकांमध्ये काम केल्यावर मला असे वाटत आहे की, आता सर्वसामान्य जनतेसाठी लोकांमध्ये जाऊन काही करण्याची माझी तयारी आहे. वाड्रा यांनी पुढे लिहिले आहे की, खास करुन उत्तर प्रदेशात काम केल्यावर असे वाटले की, इते बरेच काही करणे बाकी आहे. मला वाटते गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेले अनुभव वाया जाऊ देणे योग्य ठरणार नाही. रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, माझ्यावरील आरोप न्यायालयात खोटे ठरतील. त्यानंतर मी विस्तारीत रुपात काम करु इच्छितो. (हेही वाचा, 'सर्कस'मध्ये 'जोकर'ची कमतरता होती, भाजप पक्षाकडून रॉबर्ट वड्रा यांच्या राजकरणातील एन्ट्रीवर टीका)
Posters saying 'Robert Vadra ji you are welcome to contest elections from Moradabad Lok Sabha constituency' seen in Moradabad. pic.twitter.com/cK1feeRIfN
— ANI UP (@ANINewsUP) February 25, 2019
दरम्यान, रॉबर्ट वाड्रा हे प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचे पती आहे. प्रियंका गांधी या यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मोठ्या कन्या आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बहीण आहेत. नुकताच त्यांनी (प्रियंका) सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या काँग्रेसच्या सरचिटणीस असून, उत्तर प्रदेश या राज्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.