'सर्कस'मध्ये 'जोकर'ची कमतरता होती, भाजप पक्षाकडून रॉबर्ट वड्रा यांच्या राजकरणातील एन्ट्रीवर टीका
'सर्कस'मध्ये 'जोकर'ची कमतरता होती, भाजप पक्षाकडून रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकरणातील एन्ट्रीवर टीका (Photo Credits-ANI)

काँग्रेस (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वड्रा (Robert Vadra) हे लवकरच राजकरणात येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु झाली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रॉबर्ट वड्रा हे  उत्तर प्रदेशातून मुरादाबाद (Moradabad) मतदारसंघाकडून निवडणुक लढवणार असल्याचे पोस्टर युवा काँग्रेसकडून झळकवण्यात आले. मात्र वड्रा यांच्या राजकरणातील एन्ट्रीवर भाजप (BJP) नेता मुख्तर अब्बास नकवी (MA Naqvi) यांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली वाड्रा यांची चौकशी केली जात आहे. तरीही त्यांनी राजकरणात येऊन लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी मागणी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वड्रा यांचे मुरादाबाद येथे पोस्टर झळकवण्यात आले. परंतु केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बा, नकवी यांनी असे म्हटले आहे की, हे जे पीआर (प्रियांका-राहुल) यांचे राजकरणातील सर्कस आहे. त्यामध्ये आता जोकरची एन्ट्री शिल्लक असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेस नेता संदीप दिक्षित यांनी म्हटले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याची आणि विचारसाठी मोकळीक आहे.

तर वड्रा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका पोस्टद्वारे आपण राजकरणात येणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच खुप वर्षांचा अनुभव आणि शिक्षण वाया जाऊन देणार असल्याचे ही वाड्रा यांनी म्हटले आहे. या शिक्षणाचा उत्तम प्रकारे वापर केला जाणार असल्याचे वाड्रा यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे.