Lok Sabha Elections 2019: सुमित्रा महाजन यांची लोकसभा निवडणुकीतून माघार
सुमित्रा महाजन (फोटो सौजन्य-Getty Images)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इंदूर (Indore) येथील उमेदवारीबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. तर आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हणले आहे की. मी आता निवडणुक लढवणार नाही. त्यामुळे इंदूर येथील उमेदवारी बद्दल पक्ष आता निर्णय घेण्यास मोकळा असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भाजप पक्षाने 75 वर्षावरील नेत्यांसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेत्यांना यंदाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत तिकिट देण्यात आलेले नाही. तर सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीबद्दल पक्षात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु 80 वर्षीय सुमित्रा महाजन यांना इंदूर येथे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आगे. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षाला शक्य होत नव्हते. मात्र अखेर आज सुमित्रा महाजन यांनी घोषणा करत निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-चौकीदार सतर्क होते म्हणून देशातून पळाले नीरव मोदी आणि विजय मल्ल्या: राजनाथ सिंह)

इंदूर येथून सुमित्रा महाजन यांना सातत्याने आठवेळा निवडणून दिले होते. तसेच दुसऱ्या महिला अध्यक्षा म्हणून सुमित्रा महाजन ठरल्या होत्या.