चौकीदार सतर्क होते म्हणून देशातून पळाले नीरव मोदी आणि विजय मल्ल्या: राजनाथ सिंह
Rajnath Singh (Photo Credits_ANI)

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) प्रचारसभेच्या दरम्यान केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नीरव मोदी (Nirav Modi), विजय मल्ल्या (Vijay Mallya) आणि मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांच्यासारख्या पळकुट्या आरोपींवर सुद्धा  प्रचार सभेवेळी निशाणा साधला आहे.

युपी मधील बुलंदशहर येथील रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी असे म्हटले की, देशात काँग्रेसचे सरकार होते. परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी भारत सोडून पळाले नाही. मात्र काँग्रेसची सत्ता बाहेर गेल्याचे पाहिल्यानंतर आता नवीन चौकीदार आल्याने त्यांच्या सतर्कतेमुळे या फरार आरोपींनी देश सोडून पळाले आहेत.(हेही वाचा-नरेंद्र मोदी यांच्यामुळेच BSNL आणि MTNL बंद होण्याच्या मार्गावर: कॉंग्रेसचा आरोप)

ANI ट्वीट:

तसेच योगी आदित्यनाथन यांनीसुद्धा काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना अमेठी येथून पराभव स्विकारावा लागेल म्हणून आता वायनाड येथून सुद्धा निवडणुक लढवणार असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत केरळ मधील मुस्लिस लीग सोबत गठबंधन केल्याने यावरसुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. तर मुस्लिम लीग देशाच्या विभाजनाचे मुख्य कारण बनली होती त्यांच्यासोबतच आता काँग्रेसने गठबंधन केले आहे.