Lalu Prasad Yadav Tejashwi Yadav | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (RJD Chief Lalu Prasad Yadav) यांना सीबीआय विशेष न्यायालयाने (CBI Court) पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 60 लाख रुपये दंड असी शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे लालू प्रसाद यांची तुरुंगवारी पुन्हा एकदा निश्चीत झाली आहे. परिणामी राष्ट्रीय जनता दलाला जोरदार धक्का बसला आहे. सहाजिकच आरजेडीची धुरा सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत. सीबीआय न्यायालयाने 950 कोटी रुपयांच्या बहुचर्चीत चारा घोटाळा (Fodder Scam) प्रकरणी ही शिक्षा ठोठावली. डोरंडा कोषागारातून तब्बल 139.35 कोटी रुपयांच्या कथीत चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि इतरांवर खटला दाखल झाला होता. या खटल्यात सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव आणि इतर 38 जणांना दोषी ठरवले होते.

राजदला धक्का

लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात या आधीही शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम कारागृाहतच होता. त्यामुळे अलिकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीतच निवडणूक लढावी लागली होती. खरेतर पक्षाला हा एक धक्काच होता. या वेळी पक्षाची सर्व धुरा तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जदयुच्या खेळीला तोडीस तोड उत्तर दिले. (हेही वाचा, Fodder Scam Case: चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड)

तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हाने वाढली

विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदने मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आणल्या. राजदचा सहयोगी असलेल्या काँग्रेसने तितकी चांगली कामगीरी केली नाही. त्यामुळे राजदची सत्ता येऊ शकली नाही. अन्यथा तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राजद सत्तासमीप पोहोचलाच होता. त्यामुळे या प्रकरणात लागू प्रसाद यांना दिलासा मिळाल असता तर पुढच्या निवडणुकीवेळी तेजस्वी यादव यांना आणि पक्षाला लालू प्रसाद यादव यांचा चांगला फायदा झाला असता. मात्र, आता तसे घडणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाला हा मोठा धक्का असणारच आहे. परंतू, तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हानेही वाढणार आहेत.

38 दोषींपैकी 35 जण हे बिरसा मुंडा कारागृहात

दरम्यान, सीबीआयचे विशेष वकील बीएमपी सिंह यांनी म्हटले की, डोरंडा चारा घोटाळ्यातील 38 दोषींपैकी 35 जण हे बिरसा मुंडा कारागृहात आहेत. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्यासह तीन इतर दोषी आरोग्याच्या कारणास्तव राजेंद्र आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे दाखल आहेत. यात सीबीआयने सुमारे 170 आरोपींविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. त्यापैकी 148 आरोपींविरोधात 26 सप्टेंबर 2005 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते.

चारा घोटाळ्याच्या चार वेगवेगळ्या प्रकरणात चौदा वर्षांपर्यंतची सजा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 लोकांविरुद्ध न्यायालयाने सर्व पक्षताकांचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने 29 जानेवारीला आपला निर्णय राखून ठेवला. संयुक्त बिहारमध्ये चारा घोटाळा प्रकरण जानेवारी 1996 मध्ये पशुपालन विभागात छापेमारी केल्यानंतर पुढे आला होता. सीबीआयने जून 1997 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आरोपी म्हणून घोषीत केले होते. तपास यंत्रणांनी लालू प्रसाद आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्याविरोधा आरोप निश्चित केले होते. सप्टेंबर 2013 मध्ये खालच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधीत एका प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह इतर 45 जणांना दोषी ठरवले होते. तसेच, त्यांना रांची कारागृहात पाठवले होते.