उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या काकांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दिलेला सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी फारच मनाला लावून घेतल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यांनी म्हटले आहे की, राजकारणात निवृत्त कधी निवृत्ती असते का? म्हातारा माणूस निवृत्त होत नसतो, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलेल्या सल्ल्यावरुन प्रसारमाध्यमांनी विचारले असता, त्यांनी (अजित पवार) म्हटले म्हणून ते (शरद पवार) राजीनामा देतील का? असा थेट सवालही लालू प्रसाद यादव यांनी विचारला.
लालू प्रसाद यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) सुप्रिमो आहेत. त्यांचे पुत्र सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांनी बुधवारी शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला करत म्हटले होतेकी, आपण 83 वर्षांचे झाले आहात. आपण कधी निवृत्त होणार आणि पुढच्या पिढीला आशीर्वाद देणार आहात.आपल्या काकांवर निशाणा साधत अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी निवृत्त होऊन राष्ट्रवादीची सत्ता त्यांच्याकडे सोपवण्याची वेळ आली आहे. भाजपचे नेते 75 व्या वर्षी निवृत्त होत आहेत. तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे उदाहरण पाहू शकता. यामुळे नवीन पिढी वाढू शकते. तुम्ही (शरद पवार) आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या, आम्ही तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करू असे अजित पवार बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या गटाला संबोधित करताना म्हणाले. (हेही वाचा, Controversy in Eknath Shinde Faction: मंत्रीपदावरुन राडा, आमदारांची हाणामारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा रद्द; थेट मुंबईला परतले)
ट्विट
#WATCH | On Ajit Pawar's "retirement" remark for Sharad Pawar, RJD chief Lalu Prasad Yadav says, "Will he retire just because he says? Does an old man ever retire? In politics? No retirement in politics." pic.twitter.com/DRp7rMsXuD
— ANI (@ANI) July 6, 2023
दरम्यान, अजित पवार यांनी म्हटले की, आपल्याला बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपण हट्ट करु नका, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पवार यांच्या वयाबद्दल त्यांचे भाऊ अजित यांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले: "अमिताभ बच्चन 82 वर्षांचे आहेत आणि ते अजूनही कार्यरत आहेत. आमचा अनादर करा, पण आमच्या वडिलांचा (शरद पवार) नाही. हा लढा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात आहे, असेही त्या म्हणाल्या. काही लोकांना वाटते की, इतर म्हातारे झाले आहेत आणि म्हणून त्यांनी फक्त त्यांना आशीर्वाद द्यावा. त्यांनी त्यांना आशीर्वाद का द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत आणि देशातील सर्वात मोठ्या गटाचे नेतृत्व करत आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.