अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र फेब्रुवारी मध्ये कोणत्या तारखेला भारतात दाखल होणार याबाबत अधिकृतरित्या कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. अमेरिकेतील यंदाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. ट्रम्प यांचा भारत दौऱ्यादरम्यान गुजरात मधीस अहमदाबाद येथे 'केम छो, मिस्टर प्रेसिडंट?'(Kem chho, Mr President?) नावाचा कार्यक्रम 'हाऊडी मोदी' (Howdy Modi) सारखा आयोजित करण्यात आला आहे. तर हाऊडी मोदी या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
हिंदुस्थान टाईम्स यांच्या रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा असणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोकांच्या संबंधित लोकांनी असे सांगितले आहे की, ट्रम्प भारत दौऱ्यासाठी एकटेच येणार आहेत. त्यानुसार ट्रम्प दिल्ली सोडून अन्य एका भारतामधील शहराचा दौरा करणार आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा हा तीन दिवसांचा असणार आहे. तसेच नरेंद्र मोदी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.(काळाचा महिमा! मराठमोळे वकील हरीश साळवे देणार इंग्लंडच्या महाराणीला कायदेशीर सल्ला)
हाऊडी ट्र्म्प या कार्यक्रमात अमेरिकेतील काही नागरिकांची सुद्धा उपस्थिती असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्र्म्प आणि मोदी यांच्यामधील भेटीत व्यापारासंबंधित करार होण्याची शक्यत आहे. त्यामुळे व्यापार करारावर हस्ताक्षर केल्यास अमेरिकेतील कंपन्यांना भारतात त्यांचा व्यवसाय सुरु करता येणे सोपे होणार आहे. त्याचसोबत भारतीय नागरिकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.