Howdy Modi Event 2019 (Photo Credits: Screengrab/ Youtube)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी (21 सप्टेंबर) अमेरिकेतील (America) ह्युस्टन (Huston) शहरात हाऊडी मोदी (HowdyModi) कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तसेच या कार्यक्रमावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सुद्धा उपस्थिती लागणार आहेत. त्याचसोबत विविध क्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळी सुद्धा मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सहभागी होणार आहे. तर अमेरिकामधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी राजकीय रॅली असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाचे स्वरुप एखाद्या कार्निव्हल किंवा रॉक स्टार कार्यक्रमासारखे असणार आहे.

मोदी यांच्या ह्सुस्टन शहारातील हाऊडी मोदी कार्यक्रम तब्बल 50 हजार लोक त्यांचे भाषण ऐकू शकणार आहेत. तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून परदेशीय भारतीय मोदी यांच्या कार्यक्रमासाठी फार उत्सुक आहेत. मोदी यांच्या हा कार्यक्रम ह्युस्टन मधील एनआरजी स्टेडिएममध्ये आयोजित करण्यात आला आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचं मोठं वक्तव्य; भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटायला आवडेल)

नरेंद्र मोदी ट्वीट:

>>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे 10 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या:

>>एनआरजी स्टेडिअममध्ये कमीत कमी 50 हजार लोक पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकू शकणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील आपले विचार मांडण्याची शक्यता आहे.

>>हाऊडी मोदी कार्यक्रमात अमेरिकेतील शीर्ष आमदार, काँग्रेसचे सदस्य, सिनेटर्स, राज्याचे राज्यपाल आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असणार आहेत.

>>मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आयोजकांना 2.4 मिलियन डॉलरचं देणगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

>>या स्टेडिअममध्ये आतापर्यंत रॉक स्टार्सचे कार्यक्रम आणि फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात होते. अमेरिका मधील सर्वात मोठी राजकीय रॅली असणार आहे.

>>पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनाच्या आधी येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. कार्यक्रमात जवळपास 400 कलाकार आपली कला सादर करतील.

>>एनआरजी स्टेडिअमची क्षमता 71, 995 लोकांची असून एकाच वेळी सर्वजणांना मोदी यांचे भाषण ऐकता येणार आहे.

>>स्टेडिअमच्या आत 14,549 चौ. फूटाची मोठी एलईडी स्क्रिन्स लावण्यात येणार आहे.

>>स्टेडिअमच्या वर फॅब्रिक छप्पर असून ते पावसापासून बचाव करण्यासाठी बंद केले आहे. यामुळे कार्यक्रमावर कोणताच परिणाम दिसून येणार नाही.

>> स्टेडिअम अतिशय मोठा असल्याचे तो प्रसिद्ध आहे. हा स्टेडिअम 1,900,000 चौरस फूट असून येथे मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

>>कार्यक्रमादरम्यान 186 लग्झरी सूट्स असतील. ज्यात दिग्गज व्यक्ती बसतील. लग्झरी सूट्समुळे कार्यक्रमाचा सौंदर्य आणखीन सुंदर दिसेल.

मोदी ह्युस्टन येथील तेल आणि गॅस कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक करणार आहेत. तसेच भारतात या प्रमुखांना गुंतवणूक करण्याचे सुद्धा सांगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.