पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचं मोठं वक्तव्य; भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटायला आवडेल
डोनाल्ड ट्रंप (Photo Credits- IANS)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )येत्या 22 सप्टेंबर दिवशी अमेरिकेत आयोजित 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात आपली उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमात पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) देखील भारतीयांना संबोधणार असल्याने अनेकांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. मात्र नुकतेच अमेरिकेमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारताबद्दल कौतुकास्पद संदेश दिला आहे. डोनाल्ड ट्रंम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान पंतप्रधानांची  भेट घेण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. तेथे खूप प्रगती झाली आहे. असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अमेरिका दौर्‍यादरम्यान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट टेक्सास येथील ह्युस्टन शह्ररात होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी किंवा अमेरिकेतील महत्त्वाचं शहर न्युयॉर्क बाहेर ही भेट होणार आहे. 'हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश; पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती भारतीय समुदायाला संबोधित करणार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मोदींनीदेखील खास ट्वीट करून भारतीय त्यांच्या स्वागताला सज्ज असल्याचे म्हणाले अअहेत. तसेच त्यांचा सहभाग हा भारत - अमेरिका संबंधांना विशेष अधोरेखीत करणारा आहे. अशा आशयाचं देखील ट्वीट त्यांनी केलं आहे.

ANI Tweet  

अमेरिकेमध्ये सुमारे 50 हजाराहअधिक भारतीय नागरिक अमेरिकेतील टेक्सास येथे होणार्‍या एनआरजी स्टेडियम मध्ये 22 सप्टेंबर दिवशी आयोजित 'हाऊडी मोदी' कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. हाऊडी याचा अर्थ कसे आहात. पाश्चिमात्य देशात हाऊडी म्हणजे हाऊ डू यू डू हे संक्षिप्त रूपात वापरलं जाते.