CWC Meeting: कपिल सिब्बल राहुल गांधी यांच्यावर भडकले; भाजपा सोबत 'संगनमत' असल्याच्या टीकेवर नोंदवला आक्षेप
File image of Congress leader Kapil Sibal | (Photo Credits: PTI)

कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज (24 ऑगस्ट) सुरू झाली आहे. दरम्यान ही बैठक वादळी होणार अशी अपेक्षा होती आणि आता त्याप्रमाणेच घडामोडी घडताना दिसत आहे. आज कॉंग्रेसमध्ये जुने विरूद्ध नवे कार्यकर्ते असा पहायला मिळाले. दरम्यान कॉंग्रेस पक्षामध्ये 23 जणांनी दिलेल्या पत्रावरून आज राहुल गांधी (Rahul Gandhi) नाराज झाले आहे. हे पत्र सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये असताना तसेच राजस्थान मधील सत्तासंघर्ष सोडवताना का पाठवलं? आणि हे पत्र पाठवणारे कॉंग्रेस नेते भाजपशी संगन्मत करून धाडणारे आहेत का? असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. यावर कपिल सिब्बल (Kapil Sibal)  यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींना सवाल विचारला आहे.

कपिल सिब्बल यांनी ट्वीटरवरून भूमिका स्पष्ट करताना 'आमची भाजपा सोबत मिलीभगत आहे? मागील 30 वर्षात कोणत्याही मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देणारी भूमिका घेतलेली नाही मग तरीही आमची भाजपासोबत मिलीभगत कशी? ' असा सवाल विचारला आहे.

कपिल सिब्बल ट्वीट

गुलाम नबी आज़ाद यांनीदेखील जर भाजपासोबत आमची मिलीभगत ही टिप्पणी सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे.

ANI Tweet

दरम्यान कॉंग्रेस पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून कॉंग्रेसची कार्यपद्धती बदलण्यावर सूचना केल्या होत्या. तसेच पक्ष नेतृत्त्व हे पूर्णवेळ आणि महत्त्वाच्या प्रसंगी समोर येऊन निर्णय घेणारं असावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

सध्या सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आहे. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्त्व जाणार की राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणार असा प्रश्न आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.