CM Eknath Shinde met PM Modi :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींना विठूरायाची मुर्ती भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. कालपासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरु आहे. मख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi),  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) , राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovid), उपराष्ट्रपती व्यंकया नायडू , जे पी नड्डा (J P Nadda), सह रक्षा मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या भेटी घेतल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही या सर्व भेटीं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपस्थित होते.

 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींना विठूरायाची मुर्ती भेट दिली. तसेच गृहमंत्री अमित शाह,  राष्ट्रपती रामनाथ कोविंद , उपराष्ट्रपती व्यंकया नायडू , जे पी नड्डा , रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठ्ठल रुख्मिणीची मुर्ती भेट दिली.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यात तसेच भेटीगाठी दरम्यान मंत्रिमंडळ (Cabinet) विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याचं बोल्या जात आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या एका विशिष्ट गटाचं नेतृत्व करत असले तरीही सर्व महत्त्वाच्या निर्णयासाठी त्यांना मोदी-शाह यांच्यावरच अवलंबून राहावं लागणार असल्याचं यानुसार अधोरेखित झालं आहे. नवीन सरकारमध्ये मंत्री आणि त्यांची खाती कोणती असतील याबाबत मोदी-शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा होणार आहे.  शिंदे सरकारमध्ये एकूण 54 मंत्री असू शकतात. यामध्ये भाजपच्या कोट्यातील 25 आणि शिंदे गटातील 13 आमदारांना मंत्री केले जाऊ शकते.