'अमित शहा'नी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार; शिवसेना- भाजपा युतीच्या विजयावर व्यक्त केला विश्वास
Amit Shah- Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) गांधीनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवारअमित शहा (Amit Shah)  यांनी आज उमेदवार अर्ज दाखल केला आहे. भाजप कार्यकर्त्यांसह देशातील अनेक दिग्गज नेते देखील यावेळेस उपस्थित होते. शिवसेना आणि भाजपामधील जुने हेवेदावे विसरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी आज गांधीनगरला पोहचले होते. व्यासपीठापासून ते अगदी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयातही उद्धव ठाकरे अमित शहांसोबत दिसले.

अमित शहांनी आज उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. यावेळेस शिवसेना भाजपा युतीला महाराष्ट्रात प्रचंड मतांनी विजय मिळेल. आपली युती पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. Lok Sabha Elections 2019: पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाही, अमित शहा यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय: उद्धव ठाकरे

अमित शहा Tweet

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे दोन्हीनेते एकत्र पाहून मतदार आणि विरोधकांनाही आश्चर्य वाटले. अमित शहा - उद्धव ठाकरे भेटीवर सोशल मीडियातही बरीच चर्चा रंगली. महाराष्ट्रात यंदा चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेना - भाजपाने 23-25 चा फॉर्म्युला सेट केला आहे.