Uddhav Thackeray in Gandhinagar ( Photo Credits: Twitter)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) उतरले आहे. गांधीनगर (Gandhinagar) येथून अमित शहा निवडणूक लढणार आहेत. आज भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अमित शहा अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. त्याआधी आयोजित एका मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. अमित शहांसाठी उद्धव ठाकरे गांधीनगर मध्ये पोहचले आहेत. यापूर्वीचे सारे मतभेद विसरून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. आता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात

उद्धव ठाकरे ट्विट

शिवसेना ट्विट

निवडणुकीपूर्वी 'स्वबळा'चा नारा देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या अमित शहा आणि उद्धव ठाकरेंना गांधीनगर मध्ये एकाच व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंच झाल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी यावेळेस 'मला गांधीनगरमध्ये पाहून अनेकांच्या पोटात दुखत असेल पण बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन मी अमित शाहांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय. आमच्यात काही मतभेद होते, पण आम्ही ते मिळून दूर केले. पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाही. मी इथे अमित शाहांना पाठिंबा देण्यासाठी निर्मळ मनाने आलोय' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांसारखे बडे भाजप नेते उपस्थित आहेत.