भारत पाक नियंत्रण रेशेजवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानची 2 फायटर विमाने (Fighter Jets) भारतीय हवाई दलाला दिसली आहेत. मंगळवारी रात्री पुंछ सेक्टर येथील लाईन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ ही विमाने दिसल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही विमाने दिसताच भारतीय हवाई दलाच्या रडाड सिस्टमने(Radar Systems) तत्काळ सतर्कतेचे संदेश दिले. लढावू विमानांचा आवाज आल्याचेही एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, या आधी राजस्थान येथील आंतरराष्ट्रीय सिमारेषा ओलांडून भारतात प्रवेश करणारे पाकिस्तानचे एक ड्रोन भारताने पाडले होते. तर, श्रीगंगानगर जवळील परिसरातही असेच एक ड्रोन गुप्तरित्या पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, POK आणि सिंध येथील कार्यकर्त्यांनी पुलवामा हल्ल्याचे दु:ख व्यक्त करुन पाकिस्तानच्या अत्याचाराचे सत्य उघडले)
Information attributed to government sources https://t.co/Y1ZpCtnk1e
— ANI (@ANI) March 13, 2019
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या बालाकोट येथील कारवाई नंतर पाकिस्तान पुरता बावचळला आहे. या कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.