POK आणि सिंध येथील कार्यकर्त्यांनी पुलवामा हल्ल्याचे दु:ख व्यक्त करुन पाकिस्तानच्या अत्याचाराचे सत्य उघडले
POK आणि सिंध येथील कार्यकर्त्यांनी पुलवामा हल्ल्याचे दु:ख व्यक्त करुन पाकिस्तानच्या अत्याचाराचे सत्य उघडले (Photo Credits-ANI)

पाकव्याप्त काश्मिर (POK) आणि सिंध (Sindh) येथील कार्यकर्त्यांनी पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. त्याचसोबत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिर येथे सुरु असलेल्या दहशतवादी संघटना नष्ट कराव्यात असे यूएनएचआरसी (UNHRC) मधील बैठकीत म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या बैठकीत पाकिस्तानच्या अत्याचाराचे सत्य उघडकीस आणले आहे. तर पाकिस्तान मधील वाढता दहशतवाद आणि निती या गोष्टींवर भर टाकत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जेनेवा येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या बैठकीत पाकव्याप्त काश्मिर मधील कार्यकर्ते शौकत अली यांनी असे म्हटले की, पाकव्याप्त काश्मिर येथील दहशतवादी संघटनेच्या तळांवर बंदी घालण्यात यावी आणि त्याचसोबत ही तळे नष्ट करण्यात यावी.(हेही वाचा-पाकिस्तानने FATF मध्ये भारताविरुद्ध लावले आरोप, ग्रे लिस्ट नंतर आता ब्लॅक लिस्टमध्ये पाकचे नाव येणार)

या कार्यकर्त्यांनी युएनएचआरसीच्या बैठकी दरम्यान पुलवामा हल्लाची निंदा केली आहे. तर युनायटेड काश्मिर पिपल्स नॅशनल पार्टीचे अध्यक्ष एस अली कश्मिरी यांचे असे म्हणणे आहे की, पाकिस्तानी सैनिकांचे अधिकारी मोकळेपणाने काश्मिरी लोकांना आत्मघाती हल्ल्यांमध्ये सहभागी होण्यास सांगत आहेत.(हेही वाचा-दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करा,अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा)

तर पुलवामा येथे 14 फेब्रुवारी सीआरपीफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात घुसुन बालकोट मधील जैश संघटनेच्या तळावर हल्ला करत प्रतिउत्तर दिले.