दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करा,अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

अमेरिकेने (America) पाकिस्तानला त्यांचा देशात असणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करा असे अपील केले आहे. तसेच विदेश मंत्रालयाने असे म्हटले आहे की, पुलवामा (Pulwama) हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-E-Mohammad) दहशतवादी हल्ला आणि बालकोट (Balkot) येथे भारतीय वायुसेनेने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानवर (Pakistan) दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईसाठी जागतिक स्तरातून दबाब टाकला जात आहे. इस्लामबाद येथील गृह मंत्रालयाने घोषणा केली आहे की, पाकिस्तान मधील प्रतिबंधित समूहातील 121 सदस्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

विदेश मंत्रालयाचे उपप्रवक्ता, रॉबर्ट पालाडिने यांनी गुरुवारी असे म्हटले की, अमेरिका याबाबत पाकिस्तानकडे दहशवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अपील करत आहे. तसेच दहशतवाद्यांविरुद्ध ठोस पाऊल उचलण्यापूर्वी पाकिस्तानने याबाबत विचार करावा. त्यामुळे भविष्यात होणारे हल्ले थांबवले जातील आणि क्षेत्रात स्थिरता कायम राहण्यास मदत होईल.(हेही वाचा-पाकिस्तानची कारवाई; मसूद अझरच्या भावासह 44 दहशतवाद्यांसह अटक, मालमत्ता जप्त)

त्यांनी असे ही म्हटले की. आम्ही पुन्हा एकदा अपील करतो पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रती नियमांचे पालन करावे. त्याचसोबत दहशतवाद्यांना पाठीशी घालणे थांबवावे.