Marriage Certificate (PC - Pixabay)

Marriage Certificate: लग्नाच्या प्रमाणपत्रासंदर्भात (Marriage Certificate) मोठी बातमी समोर आली आहे. हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी शासनाने नवीन आदेश जारी केले आहेत. आता नवविवाहित जोडप्यालाही लग्नाचा दाखला काढण्यासाठी हुंड्याची (Dowry) माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतरच, त्यांचे प्रमाणपत्र बनवले जाईल. हा आदेश उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Govt) जारी केला आहे.

हुंड्याचा तपशील द्यावा लागणार -

मिळालेल्या माहितीनुसार, विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी हजारो अर्ज येतात. नियमानुसार लग्नपत्रिका, आधारकार्ड, हायस्कूलची मार्कशीट, दोन साक्षीदारांची कागदपत्रेही वधू-वरांच्या बाजूने सादर केली जात असून आता हुंड्याचा तपशीलही त्यासोबत द्यावा लागणार आहे. (हेही वाचा -Kanyadaan Not Necessary For Hindu Marriage: हिंदू विवाह सोहळ्यासाठी 'कन्यादान' आवश्यक नाही, सप्तपदी महत्वाची- High Court)

याबाबतची नोटीसही कार्यालयात लावण्यात आली आहे. अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लग्नासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक केले असून प्रत्येकाला कागदपत्रासह हुंडा प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Love Marriage Vs Arranged Marriage: प्रेमविवाह की अरेंज मॅरेज? अविवाहितांनो तुमचे प्राधान्य कशाला? जाणून घ्या फायदे-तोटे)

विवाह प्रमाणपत्र उपयुक्त -

विवाह प्रमाणपत्रानंतरच जोडपे संयुक्त बँक खाते उघडू शकतात. पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठीही विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे. विमा काढण्यासाठी जोडप्याला विवाह प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. परदेशात जाण्यासाठी विवाहाचा दाखलाही आवश्यक कागदपत्र आहे.

विवाहानंतर महिलेला तिचे आडनाव बदलायचे नसेल, तर विवाह प्रमाणपत्राशिवाय तिला सरकारी सुविधांचा लाभ घेता येणार नाही. घटस्फोटाचा अर्ज भरण्यासाठीही विवाह प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. एकल माता किंवा घटस्फोटित महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी घटस्फोटाचे कागदपत्र दाखवावे लागतात.