Love Marriage Vs Arranged Marriage: प्रेमविवाह की अरेंज मॅरेज? अविवाहितांनो तुमचे प्राधान्य कशाला? जाणून घ्या फायदे-तोटे
Marriage | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

प्रेमविमाह लव्ह मॅरेज (Love Marriage) की अरेंज्ड मॅरेज (Arranged Marriage) हा प्रश्न काहींसाठी अधिक सोपा आणि काहींसाठी तसा गुंतागुंतीचा आहे. दोन्ही प्रकारच्या विवाहांचे स्वतंत्र फायदे आणि तोटे आहेत. जे एका व्यक्तीसाठी चांगले तर दुसर्‍यासाठी अडचणीचे असू शकतात. लव्ह मॅरेज (Love Marriage Pros and Cons) आणि अरेंज्ड मॅरेज (Arranged Marriage Pros and Cons) या दोघांची स्वतंत्र गुंतागुंत आणि आव्हाने आहेत. कोणता विवाह अधिक सोपा आणि कोणता कठीण हे विविध घटकांवर अवलंबून असते. ज्यात सहभागी व्यक्ती, त्यांचे कुटुंब, सांस्कृतिक आणि सामाजिक नियम आणि वैयक्तिक प्राधान्ये यांचा समावेश होतो.

अरेंज मॅरेज अर्थातच आयोजित विवाह

अरेंज मॅरेज म्हणजेच आयोजित विवाहामध्ये, वधू आणि वरचे कुटुंब जात, धर्म, शिक्षण आणि आर्थिक स्थिती यासारख्या घटकांवर आधारित निर्णय असतात. ज्यामध्ये परस्परांचे कुटुंबीय सहभागी असतात. हे कुटुंबीय त्यांच्या मुलांसाठी (वर, वधू) योग्य जोडीदार शोधण्यात पुढाकार घेतात.यामध्ये होणाऱ्या वर आणि वधुंचे मत विचारात घेतले जाते. पण अंतिम निर्णय कुटुंबीयांचा आणि समाजिकच असतो. (हेही वाचा, Husband, Wife and Extramarital Affair: सेक्रेटरीसोबत लफडं, पत्नीला वाऱ्यावर सोडलं; साठीतल्या महिलेला कोर्टाकडून 30 हजार रुपयांची पोटगी मंजूर)

प्रेमविवाह अर्थात लव्ह मॅरेज

प्रेमविवाहात, व्यक्ती परस्पर आकर्षण, प्रेम आणि अनुकूलतेच्या आधारावर स्वतःचे भागीदार निवडतात. हा विवाह अधिक मुक्त आणि स्वायत्त निर्णय म्हणून पाहिला जाऊ शकतो. या विवाहाला कुटुंबातील सदस्यांकडून नापसंती, सांस्कृतिक मतभेद आणि आर्थिक ताणतणाव अशा प्रश्नांचा समाना करावा लागू शकतो.

प्रेमविवाह करायचे की अरेंज्ड मॅरेज करायचे याचा निर्णय वैयक्तिक आवडीनिवडी आणि परिस्थितीवर आधारित असायला हवा. प्रेमविवाहाला अधिक मुक्त आणि स्वायत्त निर्णय म्हणून पाहिले जाऊ शकते. पण अनेकदा हा स्वायत्त निर्णय अनेक आव्हानेही निर्माण करु शकतो. दुसरीकडे, अरेंज मॅरेज किंवा सुनियोजीत विवाह स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करू शकतो. कारण तो एक समूहात्मक निर्णय असतो. ज्यात परस्परांचे कुटुंबीय आणि नातेवाईक सहभागी असतात. दोन्ही विवाहांमध्ये तडजोड आणि नवीन जीवनशैलीशी जुळवून घेण्याची आवश्यकता असते. दोन्ही विवाहांमध्ये मोकळ्या मनाने आणि नातेसंबंध कार्यान्वित करण्यासाठी वचनबद्धतेने लग्नाकडे जाणे महत्त्वाचे आहे.