SEBI, AI (PC - Wikipedia/File photo)

SEBI Using AI for Investigations: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरत आहे. सेबीचे स्थायी सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध घटकांनी तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे यावर भर दिला. शेअर बाजारातील हेराफेरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी सांगितले आहे की, कायद्याचे पालन करणे अधिक फायदेशीर ठरेल आणि त्याचे उल्लंघन केल्याने समस्या उद्भवतील. आम्ही तपासासाठी एएआय वापरत आहोत. इतर अनेक गोष्टींसाठीही त्याचा वापर केला जात आहे.

नवी दिल्लीत असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI) च्या 13 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने वार्ष्णेय बोलत होते. जोपर्यंत बाजार पारदर्शक आहे आणि कोणताही फेरफार होत नाही तोपर्यंत नियामकांच्या दृष्टिकोनातून ते ठीक आहे, असेही वार्ष्णेय यांनी सांगितले. (हेही वाचा - SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) शेअर बाजारातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि चुकीच्या कामांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करत आहे. वार्ष्णेय यांनी शनिवारी लोकांना भांडवली बाजारातील हेराफेरीपासून सावध केले. तसेच दलालांवर लक्ष ठेवून अशा घटनांना आळा घालण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या अनियमिततांमध्ये गुंतलेल्या अनेक संस्थांवरही सेबी कारवाई करत आहे. (SEBI Ban YouTube Channels: SEBI ने 24 YouTubers च्या चॅनलवर घातली बंदी; गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि स्टॉक मार्केटचं नुकसान केल्याचा आरोप)

फ्रंट रनिंग ही एक बेकायदेशीर प्रथा आहे जिथे एखादी संस्था त्याच्या ग्राहकांना माहिती उपलब्ध करून देण्यापूर्वी ब्रोकर किंवा विश्लेषकाकडून आगाऊ माहितीवर आधारित व्यापार करते. भारतात हे बेकायदेशीर आहे, कारण ते किमतींवर अन्यायकारकपणे प्रभाव टाकते, असंही वार्ष्णेय यांनी सांगितलं आहे.