Photo Credit -Pixabay

Noida Shocker: नोएडा येथे पारस टिएरा सोसायटी या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये रविवारी रात्री एक विचित्र अपघात झाला. ज्यात लिफ्टचे ब्रेक फेल झाल्याने लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट २५ व्या मजल्याचा वर गेली अन् छताला धडकली(Lift crash). सेक्टर 137 मधील पारस टिएरा सोसायटीमध्ये ही घटना घडली. त्यावेळी लिफ्टमध्ये पाच रहिवासी होते. ज्यात तीन महिलांचा समावेश होता. ते जखमी(injured) झाले असून अत्यंत घाबरले आहे. दरम्यान, गृहसंकुलातील लिफ्ट अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अवघ्या काही महिन्यांआधी घडली होती. ती घटना ताजी असतानाच ब्रेक फेल होऊन लिफ्ट छताला धडकल्याची घटना घडल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हेही वाचा:Hydrabad Bike Blast: रॉयल एनफिल्ड बाईकचा भीषण स्फोट, 10 जण जखमी, हैद्राबाद येथील घटना (Watch Video))

गृहसंकूलातील टॉवर-5 च्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट होती. त्यावेळी लिफ्टचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि लिफ्ट वर जाऊ लागली. लिफ्ट थेट 25व्या मजल्यावर पोहोचली आणि छताला धडकली. अपघातात लिफ्टमध्ये उपस्थित असलेले तीन जण जखमी झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. या घटनेनंतर टॉवरवरील दोन लिफ्ट बंद करण्यात आल्या असून रहिवाशांना पायऱ्यांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

नियमित देखभालीअभावी लिफ्टमध्ये बिघाड झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तर तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनंनतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

"आम्ही या संपूर्ण घटनेची वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांकडून चौकशीची मागणी करणार आहोत. रहिवाशांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू," असे पारसच्या अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने सांगितले. टिएरा सोसायटीने एका निवेदनात.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये,याच सोसायटीमध्ये एका वृद्ध महिलेचा संभाव्य हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कारण त्यांच्यासोबत आपघातात लिफ्टची केबल तुटून ती लिफ्ट खाली पडली होती.त्यानंतर एका महिन्यातच नोएडा एक्स्टेंशनमधील आम्रपाली ड्रीम व्हॅली हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लिफ्टच्या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता.