कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु अजूनतरी यासाठी कोणतीही लस किंवा औषध बनविण्यात यश आले नाही. सध्या कोरोना व्हायरसच्या शंभराहून अधिक लसींवर काम सुरू आहे. या व्यतिरिक्त औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. पण आतापर्यंत तरी कोणालाही ठोस यश मिळालेले नाही. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने काही औषधांच्या चाचण्या (Solidarity Trial) होणार आहेत. यामध्ये कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी ही औषधे किती प्रभावी आहेत हे ठरवले जाईल. अहवालानुसार, डब्ल्यूएचओ चाचणी कार्यक्रमात भारतातील किमान 1500 कोरोना रुग्ण देखील सामील होणार आहेत.
या कार्यक्रमात सुमारे 100 देशांमधील रुग्णांचा समावेश असेल. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या संदर्भात रुग्णांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. या विशेष कार्यक्रमासाठी आतापर्यंत भारतातील 9 हॉस्पिटलची निवड झाली आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की ही संख्या आणखी वाढविली जाईल. आयसीएमआर-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर शीला गोडबोले म्हणाल्या, 'सध्या ज्या ठिकाणी बहुतांश रुग्ण आहेत त्या ठिकाणी या चाचण्या होणार आहेत. यापूर्वी 9 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे व लवकरच आणखी 4 रुग्णालयांना यात सामील केले जाईल. यामध्ये रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही त्यामुळे आम्ही या प्रोग्राममध्ये आणखी रूग्णांचा समावेश करू शकतो.' (हेही वाचा: कोणत्या देशात कोरोना व्हायरस संक्रमित किती रुग्ण? जगभरात 43 लाख नागरिकांना COVID-19 संक्रमन; 3 लाखांहून अधिक मृत्यू)
Coronavirus Outbreak: Maharashtra मध्ये २५ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण; २४ तासात ३७२२ नवे रुग्ण - Watch Video
ट्रायल दरम्यान रुग्णांना अँटी-व्हायरल औषधे दिली जातील. यामध्ये Remdesivir, Chloroquine/Hydroxychloroquine, Lpinavir-ritonavir आणि Lopinavir-ritonavir with interferon (β1a) यांचा समावेश आहे. चाचणी दरम्यान, यापैकी कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णवर परिणाम होत आहे की नाही याची तपासणी केली जाईल. सध्या ज्या रुग्णालयामधील रूग्णांची निवड झाली आहेत त्यामध्ये, जोधपूरमधील एम्स, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि भोपाळातील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल समाविष्ट आहेत.