जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या 43 लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोना व्हायरस (COVID-19) संकटाच्या विळख्यात येऊन मृत्यू झालेल्या नागरिकांची जगभरातील संख्या ही 3 लाखांपेक्षाही अधिक आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीतील सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार जगभरात गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे 43 लाख 47 हजार 15 लोक कोरोना व्हायरस संक्रमित आहे. तर, जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 97 हजार 197 इतकी आहे.
कोरोना व्हायरस संकटाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. या देशात एकूण 84 हजार 119 नागरिकांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला आहे. तर आतापर्यंत 13 लाख 90 हजार 406 जणांना कोरोना व्हायरस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेपाठोपाठ रशियाचा नंबर लागतो. रशियात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2 लाख 42 हजार 271 इतकी आहे. (हेही वाचा, कोरोना व्हायरस कदाचित कधीच नष्ट होणार नाही; कोविड 19 सह जगण्याची जगाला सवय करुन घ्यावी लागेल- WHO चा गंभीर इशारा)
कोणत्या देशात कोरोना व्हायरस संक्रमित किती रुग्ण?
- अमेरिका- 13 लाख 90 हजार 406
- इंग्लंड- 2 लाख 30 हजार 986
- स्पेन- 2 लाख 28 हजार 691
- इटली- 2 लाख 22 हजार 104
- ब्राझिल- 1 लाख 90 हजार 137
- फ्रान्स- 1 लाख 78 हजार 184
- जर्मनी- 1 लाख 74 हजार 98
- तुर्की- 1 लाख 43 हजार 114
- इराण- 1 लाख 12 हजार 725
- भारत- 49 हजार 219
सीएसईच्या आकडेवारीनुसार जागरीतक स्तरावरील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युदराचे प्रमाण पाहता इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडमध्ये 33 हजार 264 नागरिकांचा मृत्यू कोरोना व्हायरस संक्रमनामुळे झाला आहे. दरम्यान, दहा हजारपेक्षाही अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये स्पेन (31 हजार 106 मृत्यू), फ्रान्स (27 हजार 104 मृत्यू) आणि ब्राझील (13 हजार 240 मृत्यू) या देशांचा समावेश आहे.