कोरोना व्हायरस कदाचित कधीच नष्ट होणार नाही; कोविड 19 सह जगण्याची जगाला सवय करुन घ्यावी लागेल- WHO चा गंभीर इशारा

संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन आता काही देशांमध्ये शिथील करण्यात येत आहे. तसंच कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान कोरोना कदाचित कधीच पूर्णपणे नष्ट होणार नाही, असे WHO ने म्हटले आहे.

Close
Search

आंतरराष्ट्रीय Darshana Pawar|

World Health Organization (File Photo)

कोरोना व्हायरस कधीच नष्ट होणार नसून जगभरातील लोकांना कोविड 19 सह जगण्याची सवय करुन घ्यायला हवी, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन आता काही देशांमध्ये शिथील करण्यात येत आहे. तसंच कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरस कदाचित कधीच पूर्णपणे नष्ट होणार नाही, असे WHO ने म्हटले आहे. चीनच्या वुहान शहरातून कोविड 19 चा पसरला. गेल्या वर्षाच्या अखेरपासून प्रसाराला सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात आपली व्याप्ती वाढवली. त्यामुळे सध्या जगभरातील तब्बल 4.2 मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली असून सुमारे 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

"कोरोना व्हायरस हा पूर्णपणे नवा असल्याने त्यावर मात करणे कधी शक्य होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे," असे WHO चे आपत्कालीन संचालक माइकल रयान यांनी सांगितले. हा व्हायरस कदाचित इतर व्हायरसप्रमाणे आपल्यासोबत कायम राहील, कधीच नष्ट होणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. HIV नष्ट झालेला नाही. मात्र त्यातून मार्ग काढत त्यासोबत जगणे आपण शिकलो आहे, असेही ते म्हणाले. (Lockdown: लॉकडाऊन योग्य पद्धतीने नाही हटवला तर समस्या गंभीर- जागतिक आरोग्य संघटना)

रयान पुढे म्हणाले की, "सर्व पूर्ववत होण्यासाठी अजून खूप काळ जायचा आहे."  तसंच रायन यांनी जगभरातील आरोग्य सेवकांवर झालेल्या हल्ल्यांचाही नषेध केला. "कोविड 19 च्या संकटामुळे आपल्यातील चांगले गुण बाहेर येतील तर वाईट गुणांचेही प्रदर्शन होईल," असेही ते म्हणाले. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी संपूर्ण जग विविध मार्ग शोधत आहे. दरम्यान यावर ठोस लस शोधून काढणे आणि जगभरात सर्वत्र ती उपलब्ध करुन देणे. ही मोठी संधी जगाला मिळाली आहे, असे रयान यांनी सांगितले.

कोरोना व्हायरस संकटकाळात जगभरातील निम्म्याहून अधिक देश लॉकडाऊनच्या स्थितीत आहेत. परंतु, आता अनेक देशात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र यामुळे कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरणार नाही, याची खात्री देता येणार नाही. "अनेक देश कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. परंतु, कोणत्याही देशातील सर्वोच्च पातळीवर शक्य तितक्या सतर्कतेचा सल्ला आम्ही अजूनही देत आहोत," असे WHO चे प्रमुख Tedros Adhanom म्हणाले.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel