
Viral Video: पोस्टर फाडल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २३ जानेवारी मंगळवारी घडली.या घटनेत ५ जणांनी कार्यकर्त्याला निर्दयीपणे मारहाण केली. अजित पवार गटाशी संबंधित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवत नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडल्याचा आरोप करून मारहाण करण्यात आला. हेही वाचा- ठाकरे गटाकडून बीएमसी अभियंत्यास मारहाण, अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे पक्षाचा कार्यकर्ता इरफान सय्यद (वय वर्ष ४९) हा मुंब्रा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु केली आणि पाच हल्लेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याचे कबुल केले. पोस्टर फाडल्याबद्दल सय्यद यांनी माफी मागितली नाही त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. सय्यद यांना धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. एकाने या घटनेचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर प्रसारित केला.
इरफान फरमान अली सय्यद या 49 वर्षीय चालक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा वाहनतुक सेनेचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मुंब्रा शहरात सर्वत्र प्रेम असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याचे मान्य केले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी संपात व्यक्त केला आहे.