Varun Gandhi and Maneka Gandhi | (Photo Credits: Facebook)

वरुण गांधी (Varun Gandhi) हे भाजपमधील बहुदा एकमेव नेते असावेत जे लखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणावरुन सातत्याने शेतकऱ्यांची बाजू लावून धरत आहेत. भाजप (BJP) खासदार असलेल्या वरुण गांधी यांनी आताही आपलया ट्विटर हँडलवरुन त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा संपादीत अंश असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतला त्यांनी मोठ्या हृदयाच्या नेत्याचे महत्त्वाचे शब्द! असे शर्षक दिले आहे. वरुण गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओतून कोणताही नामोल्लेख टाळत भाजपवर निशाणा (Varun Gandhi attacks on BJP साधला आहे.

वरुण गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्हिडिओमध्ये दिसते की, वाजपेयी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करताना दिसत आहेत. अटलबिहारी म्हणत आहेत की, 'मी सरकारला इशारा देऊ इच्छितो की, शेतकऱ्याचा छळ थांबवा. घाबरविण्याचा प्रयत्न करु नका. शेतकरी घाबरणार नाही. आम्ही शेतकरी आंदोलनाचा उपयोग राजकीय वापरासाठी करु इच्छित नाही. पण शेतकऱ्याच्या योग्य मागण्यांचे नक्कीच समर्थन करतो आहोत. जर सरकार शेतकऱ्याचे दमन करे, कायद्याचा दुरुपयोग करेन, शांततापूर्ण आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर शेतकरी आंदोलनात आम्ही उतरण्यास संकोचनार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत राहू.' (हेही वाचा, BJP राष्ट्रीय कार्यकारिणीतून मेनका आणि वरुण गांधी यांना वगळले; Lakhimpur Kheri Violence बद्दल केले होते ट्विट)

ट्विट

भाजपने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी पाठिमागील रविवारी (10 ऑक्टोबर) जाहीर केली. या कार्यकारीणीतून खासदार वरुण गांधी आणि आणि खासदार मनेका गांधी यांना वगळण्यात आले. लखीमपूर खीरी प्रकरणात वरुण गांधी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अज मिश्रा यांच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी निशाना साधला होता. यात वरुण गांधी यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतू, लखीमपूर खीरी येथील घटना म्हणजे हत्याकांड असल्याचे म्हटले होते.