BJP राष्ट्रीय कार्यकारिणीतून मेनका आणि वरुण गांधी यांना वगळले; Lakhimpur Kheri Violence बद्दल केले होते ट्विट
Maneka Gandhi and Varun Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप केंद्रीय कार्यकारिणी (BJP National Executive) जाहीर झाली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना प्रथमच संधी देण्यात आली. तर पक्षाचे जुणे जाणते आणि महत्त्वाच्या चेहऱ्यांना वगळण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पीलीभीत (Pilibhit) येथील भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) आणि त्यांच्या मातोश्री मेनका गांधी (Maneka Gandhi) यांचा समावेश आहे. लखीमपुर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violenc) प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक मोठे ने मौन बाळगून आहेत. दरम्यान, वरुण गांधी आणि मनेका गांधी यांनी मात्र लखीमपुर खीरी हिंसाचार प्रकरणी सातत्याने भाष्य केले. ट्विटरवरवरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लाखीमपूर प्रकरणी घेतलेली भूमिकाच मनेका गांधी मायलेकरांना कार्यकारणितून वगळण्याचे कारण ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपतील सूत्रांनी मात्र हे पक्षांतर्गत झालेले नियमीत बदल असल्याचे प्रसारमाध्यमांना म्हटले आहे.

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जेव्हा एका काळ्या रंगाच्या SUV वीने आंदोलक शेतकऱ्यांना धडक दिली. त्यांना चीरडत ही SUV घटनास्थळावरुन निघून गेली. तेव्हा ही हिंसा घडली होती. (हेही वाचा, BJP National Executive Committee: भाजपने जाहीर केली राष्ट्रीय कार्यकारिणी; Narayan Rane यांना वगळले, जाणून घ्या महाराष्ट्रातून कोणत्या नेत्यांचा झाला समावेश)

लाखीमपूर खीरी हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले आहेत. विरोधकांकडून या सर्व प्रकरणाचा निशेष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सत्तेत असलेल्या भाजप खासदार वरुन गांधी यांनीही बुधवारी लाखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन धडकवल्याचा एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. याच घटनेतील आणखी एक व्हिडिओ (दुसरा) वरुन गांधी यांनी ट्विटरवर गुरुवारी शेअर केला होता. आगोदरच्या व्हिडिओपेक्षा हा अधिक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अधिक गोष्टी स्पष्टपणे दिसत आहे. वरुण गांधी यांच्या प्रमाणेच अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटर आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

वरुन गांधी यांनी बुधवारी ट्विट केलेल्या व्हिडिओसोबत म्हटले होते की, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना वाहनाने जाणीवपूर्वक चिरडण्याचा हा व्हिडिओ आत्म्याला ठेच पोहोचवतो. पोलिसांनी या व्हिडिओची माहिती घेऊन गाडीमालक आणि त्यात बसलेल्यांची चौकशी करावी. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना तातडीने अटक केली जावी. '

वरुण गांधी यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटले होते की, 'हा व्हिडिओ आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. आंदोलनकर्त्यांची हत्या करुन त्यांचा आवाज दाबता येऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे रक्त वाहणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यायला हवे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात अशांतता आणि निर्दयता निर्माण होण्यापूर्वी त्यांना न्याय द्यायला हवा.'