देशभरात कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) ड्राय रन्स (Dry Runs) पार पडल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, लसीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. 16 जानेवारी पासून देशभरात कोविड-19 च्या लसीकरण मोहिमेला (Vaccination Drive) सुरुवात होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात साधारणपणे 3 कोटी आरोग्यसेवक (Healthcare Workers), फ्रंटलाईन वर्कर्स (Frontline Workers) यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांनतर 50 वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यांची संख्या साधारणपणे 27 कोटी इतकी आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.
देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथील कोविड-19 संसर्गाची परिस्थिती आणि लसीकरणाची तयारी याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (COVID-19 Vaccination in India: केवळ आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांनाच मिळणार मोफत लस; डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण)
ANI Tweet:
PM Modi chaired a high-level meeting to review status of #COVID-19 in the country along with preparedness of the State/UTs for COVID vaccination, today. Meeting was attended by Cabinet Secretary, Principal Secretary to PM, Health Secretary, & other senior officials: Govt of India https://t.co/grfgIRk6wt
— ANI (@ANI) January 9, 2021
3 जानेवारी रोजी भारत बायोटेक ची कोवॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आत्पातकालीन वापरासाठी DCGI कडून परवानगी मिळाली. दरम्यान, इतर लसी विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी 2 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी देशभरात लसीच्या ड्राय रन्स पार पडल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 1,04,31,639 इतकी असून त्यापैकी 2,24,190 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1,00,56,651 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1,50,798 जणांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेले रुग्णही देशात आढळून येत आहेत.