Adar Poonawalla (PC - PTI)

कोरोना व्हायरस संकटामुळे (Coronavirus Pandemic) जनजीवनाची घडी विस्कटली आहे. अनलॉकच्या माध्यमातून सर्व सेवा-सुविधा पूर्ववत झाल्या असल्या तरी संकट कायम आहे. त्यामुळे काही प्रमाणात बंधनं, नियम पाळावी लागत आहेत. या सर्व परिस्थितीत सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ (CEO) अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आशादायी माहिती दिली आहे. लसीला या महिन्याअखेरपर्यंत मंजूरी मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच लसीला मंजूरी मिळाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत बहुतांश लोकांना लस मिळेल आणि त्यानंतर जनजीवन पूर्ववत होईल, असे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

Economic Times Global Business Summit मध्ये बोलताना पूनावाला म्हणाले की, "या महिनाअखेरपर्यंत आम्हाला लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळेल. मात्र व्यापक स्वरुपात लसीचा वापर करण्याची परवानगी नंतर मिळण्याची शक्यता आहे. तरीही आम्हाला विश्वास आहे की, जर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून परवानगी मिळाल्यास भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात होईल."

"भारतात एकदा 20 टक्के लोकांना लस मिळाल्यास नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि संवदेना पुन्हा जागरुक होतील, अशी आम्हाला आशा आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी पुरेशा लसी उपलब्ध होतील आणि जनजवीन पूर्वपदावर येऊ शकेल," असे पूनावाला म्हणाले. (Covid-19 Vaccination in Maharashtra: जाणून घ्या कसा असेल महाराष्ट्रातील कोरोना विषाणू लसीकरणाचा कार्यक्रम; मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी)

सरकार आणि खाजगी मार्केटसाठी पुरेसे लसींचे डोसेस विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. जुलै 2021 पर्यंत सरकारला 30 ते 40 कोटी डोस घ्यायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सीरम इंस्टिस्ट्यूने कोविड-19 लसीच्या उत्पादनासाठी Novavax सोबत करार केला आहे. त्यामुळे 2021 च्या पहिल्या टप्प्यात Novavax च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

ऑक्टोबरपर्यंत सामान्य जीवन परत येऊ शकेल असा विश्वास पूनावाला व्यक्त करताना पूनावाला म्हणाले की, "लसीकरण केंद्रावर दररोज केवळ 100 डोसेस देण्याची राज्यांची योजना आहे. आरोग्य मंत्रालयाच्या SOP वर आधारित राज्ये पायाभूत सुविधा विकसित करीत आहेत. दरम्यान, लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे 30 मिनिटांसाठी परीक्षण केले जाईल."