उत्तर प्रदेशात दिवाळीच्या सणानिमित्त फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही नागरिकांनी फटाके उडवत दिवाळीचे धुमधडाक्यात सेलिब्रेशन केल्याचे फोटो आता समोर आले आहेत. राजधानी दिल्ली ते उत्तर प्रदेशातील बहुतांश शहरांमध्ये वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच दिवाळीच्या संध्याकाळी लोकांनी फटाके फोडल्याने त्यात आता अधिक भर पडली आहे.(Delhi Pollution: दिल्लीमध्ये प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; 73 टक्के घरातील एक तरी व्यक्ती आजारी- Survey)
दिवाळीच्या सकाळी नोएडा आणि गाजियाबाद मध्ये वायु प्रदुषणाचा स्तर अतीगंभीर असल्याची नोंद करण्यात आली. तर राज्यातील बाजूंच्या शहार सुद्धा अशाच पद्धतीची स्थिती निर्माण झाले आहे. योगी सरकारकडून वायु प्रदुषणाची परिस्थिती पाहता राज्यातील काही शहरांमध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या शहरांमध्ये एनसीआर, मुजफ्फरनगर, आगरा, वाराणसी, मेरठ, हापुड, गाजियाबाद, कानपुर, लखनौ, मुरादाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, बागपत आणि बुलंदशहर यांचा समावेश आहे.(Ayodhya Deepotsava Celebrations: दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने सजली अयोध्या नगरी; दिवाळीनिमित्त शरयू काठी 5.51 लाख दिवे प्रज्वलित करून स्थापित होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड See Video)
Fire crackers waste seen on the streets of Varanasi post #Diwali celebrations.
State govt has imposed a ban on sale/use of crackers in NCR, Muzaffarnagar,Agra,Varanasi, Meerut,Hapur, Ghaziabad, Kanpur, Lucknow,Moradabad, Noida, Greater Noida, Baghpat, Bulandshahr - till Nov end pic.twitter.com/P6DyNMzcxL
— ANI UP (@ANINewsUP) November 15, 2020
बातमीनुसार, राज्यातील गाजियाबाद शहरात शनिवारी रात्री नागरिकांनी फटाके फोडले. शहरात राहणाऱ्या एका महिलेने म्हटले की, कोणीही एनजीटी यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्याचसोबत पर्यावरणाचे नुकसान होत आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष केले गेले. लोकांनी प्रशासनाकडून फटाक्यांवर बंदी घातली तरीही फटाके उडवले.
तर वायु प्रदुषण असलेल्या शहरांपैकी एक गाजियाबाद याचा सुद्धा समावेश आहे. डॉक्टर घरातून मास्क घालूनच बाहेर पडा असे सांगतात. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाने गेल्या शनिवारी गाजियाबाद शहर हे तीसरे सर्वाधिक प्रदुषण असलेले शहर म्हणून घोषित केले होते.