देशात कोरोना व्हायरस रिपोर्टिंगच्या बाबतीत उत्तर प्रदेश व बिहारची सर्वात वाईट कामगिरी, कर्नाटकाचे Covid-19 Reporting सर्वात चांगले- Stanford Study
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) संशोधकांनी अभ्यासात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या डेटाची नोंद अथवा रिपोर्टिंग (Reporting) करण्यात भारतामध्ये कर्नाटकने (Karnataka) सर्वात चांगले काम केले आहे. त्याचबरोबर बिहार (Bihar)  आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) या राज्यांनी देशात सर्वात वाईट काम केले आहे. प्रीप्रिंट रेपॉजिटरी 'मिडरेसीव्ह' (Preprint Repository ‘MedRxiv') मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोविड-19 डेटाचा पारदर्शक आणि सहज उपलब्ध अहवाल हा सार्वजनिक आरोग्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार संशोधकांनी, भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोरोना व्हायरस डेटाच्या रिपोर्टिंगच्या गुणवत्तेचे व्यापक मूल्यांकन सादर केले आहे.

या अहवालात भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या प्रयत्नांचे आणि सरकारच्या महामारीच्या डेटा रिपोर्टिंगच्या मार्गदर्शक सूचनांचे कितापन पालन झाले आहे, ते दिसून येते. वस्तुस्थिती शोधण्यासाठी, संशोधन पथकाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे घेतलेल्या कोविड-19 चाचणीच्या गुणवत्तेचे विश्लेषण केले. 19 मे ते 1 जून या कालावधीत 29 राज्यांनी केलेल्या कोरोना डेटा रिपोर्टिंगची गुणवत्ता संशोधक पथकाने तपासली. संशोधकांच्या मते, यातून समोर आलेले निकाल भारतातील राज्य सरकारांनी केलेल्या कोविड-19  डेटा रिपोर्टिंगच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात असमानता दर्शवितात.

अभ्यासानुसार हे सिद्ध झाले की, कर्नाटकातील 0.61 हे सर्वात उत्तम आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेशातील 0.0, हे अतिशय खराब आहे. याव्यतिरिक्त, संशोधकांना असे आढळले की, पंजाब आणि चंदीगड यांनी क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या लोकांची ओळख त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केली आहे, ज्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचे नुकसान झाले आहे. एकूणच, भारतात कोरोना व्हायरसच्या रिपोर्टिंगची गुणवत्ता केवळ 0.26 होती, जी देशभरात खराब रिपोर्टिंग दर्शविते. (हेही वाचा: मास्क न घातल्याने बकरीला अटक, उत्तर प्रदेशातील विचित्र घटना उघडकीस)

हिमाचल प्रदेश, मेघालय आणि अंदमान निकोबार बेटांनी फक्त एकूण संख्या दिली परंतु, त्यांनी दररोजची संख्या, ट्रेंड ग्राफिक्स आणि तपशील दिले नाहीत. बिहारने आपला डेटा केवळ ट्विटरवर जाहीर केला, जो माहिती प्रसारित करण्याचा सोपा आणि विश्वासार्ह मार्ग नाही. कर्नाटकने सर्वात चांगली कामगिरी केली. त्यानंतर केरळ, ओडिशा, पुडुचेरी आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो.