PM Modi addressing the US-India forum | (Photo Credits: ANI)

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबध (India-US Relationship) सुधारावेत यासाठी स्थापन करण्यात आलल्या 'यूएस-इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनरशिप फोरम' (USISPF) च्या तिसऱ्या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (3 सप्टेंबर 2020) संबोधित केले. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की आजचा काळ एका नव्या दृष्टीकोणाची मागणी करत आहे. हा दृष्टीकोण म्हणजे मानव केंद्रित विकास. कोरोना व्हायरस संकटाच्या काळात भारत पहिला देश ठरला. ज्या देशाने फेस कव्हर आणि मास्क वापर हा एक आरोग्याचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून स्वीकारला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे या संमेलनात भाग घेतला.

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, सोशल डिस्टंन्सींग पाळण्यासाठी आम्ही जनजागृती अभीयान सुरु केले होते. कोरना व्हायरस महामारीच्या काळात आम्ही कोविड 19 चाचण्यांची क्षमता, आयसीयू, पीपीई किट यांसराख्या आवश्यक साधनांमध्ये योग्य वेळी आवश्यक बदल केले. ज्यामुळे आम्ही आमच्या क्षमता वाढवू शकलो. या पुढेही आपल्याला आपल्या क्षमतांवर अधिक जोर द्यायला हवा,असेही पंतप्रधान म्हणाले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना व्हायरस संकटाचा आम्ही मोठ्या धिराने आणि भक्कमपणे सामना केला. भारताने लॉकडाऊन अत्यंत जबाबदारीने लागू केला. पीपीई किट निर्माण करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

पंतप्रदान मोदी यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संकट काळात गरीब लोकांना वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. संपूर्ण कोरोना काळात लॉकडाऊन काळात भारत सरकारचा एकच उद्देश होता गरीबांचे रक्षण करणे. पंतप्रदान गरीब कल्याण योजना संपूर्ण जगात सर्वात मोठी प्रक्रिया आहे. या योजनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास 800 कोटी लोकांना अन्नधान्य उपलब्ध करुन दिले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी आमचा भर आहे. आम्ही आपल्या बँकिंग प्रणालीला अधिक मजबूत केले आहे. आज जग आमच्यावर विश्वास ठेवत आहे. भारत हा संपूर्ण जगासाठी गुंतवणूक करण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. भारताने उद्योगासाठी एक चांगले वातावरण तयार केले आहे. ज्यामुळे जगभरातील उद्योग भारताला प्राधान्य देत आहेत. गूगल, अमेझॉन यांसारख्या कंपन्याही आता भारतात प्रदीर्घ काळ गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.