(Photo Credits: AIR/ Twitter)

डिजिटल इंडिया, कॅशलेस प्रणाली यांबाबत कितीही गप्पा मारल्या तरी आणीबाणीची परिस्थिती निर्णय आली तर सोबत असावे म्हणून रोख रक्कम सोबत बाळगणे केव्हाही चांगले. याचीच प्रचिती देशभरातील नागरिक घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार भारतभरतील नागरिक बँकींग व्यवहारांसाठी UPI सेवा वापरत असताना समस्यांचा सामना (UPI Down in India) करत असल्याची माहिती आहे. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आहे. खास करुन Google Pay आणि PhonePe सारख्या लोकप्रिय UPI ॲप्स द्वारे सेवा वापरताना वापरकर्त्यांना समस्या येत असल्याच्या तक्रारी आहेत.

एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदाची सेवा विस्कळीत

डाउनडिटेक्टर, प्लॅटफॉर्म मॉनिटरिंग आउटेजने म्हटले आहे की, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदाचे ग्राहक प्रामुख्याने सेवा व्यत्ययामुळे प्रभावित होताना आढळून आले आहेत. खास करुन सेवेतील हा व्यत्यय UPI व्यवहार करताना उद्भवतो आहे. जेव्हा एखादा व्यवहार पूर्ण करण्यासाठी सूचना केली जाते तेव्हा तिचे पालन न होत नाही. थेट व्यवहार रद्द होतो आहे आणि पैसेच पुढे पाठवले जात नाहीत. (हेही वाचा, Google Pay Outside India: भारताबाहेर UPI payments ची सेवा देण्यासाठी गूगल पे चा NPCI सोबत करार)

आतापर्यंत 250 तक्रारी

डाऊनडिकेक्टरच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत 250 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 60% तक्रारी निधी हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आलेल्या समस्या दर्शवतात. 35% तक्रारी मोबाइल बँकिंग समस्यांची तक्रार करतात आणि इतर खात्यातील शिल्लक संबंधित समस्यांचा अनुभव घेत आहेत. विविध बँकांच्या सर्व्हरमध्ये व्यत्यय येत असल्याबाबत भारतभरातील वापरकर्त्यांना बँकिंग सेवांमध्ये, विशेषत: UPI व्यवहारांमध्ये अडचणी येत आहेत असल्याचे यूजर्सनी म्हटले आहे. UPI ॲप्सचा वापर करून पेमेंट अयशस्वी झाल्याच्या तक्रारी X (पूर्वीचे Twitter) सह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढल्या आहेत. (हेही वाचा, UPI Tap And Pay: UPI टॅप अँड पे सेवा जानेवारीत सुरू होणार, QR कोडला रामराम)

प्रसारमध्यमांतील वृत्तानुसार, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनी निधी हस्तांतरणाशी निगडीत 75 टक्के समस्या, 14 टक्के लॉगिन समस्या आणि ATM सेवांबाबत तक्रारी व्यक्त केल्या आहेत.

UPI आयडी म्हणजे काय?

UPI आयडी, ज्याला युनिफाइड पेमेंट इंटरफेस आयडी म्हणूनही ओळखले जाते, हे डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी UPI प्रणालीमध्ये वापरले जाणारे एक अद्वितीय ओळखकर्ता आहे. हे वापरकर्त्यांसाठी अखंडपणे पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी एक ओळख पत्ता म्हणून कार्य करते.

इंटरनेटमध्ये क्रांती झाल्यानंतर आणि भारताने डिजिटल इंडियाचा पर्याय स्वीकारल्यापासून भारतात कॅशलेस इकॉनॉमिचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. खास करुन मॉल, पेट्रोलपंप आणि सरकारी कार्यालयांसबतच पानटपरी, छोटे उद्योजक, ठेल्याची दुकाने, दिहाडी मजूर, यांसारख्या सामान्य लोकांमध्येही यूपीआय प्रणालीद्वारे व्यवहारांची संख्या वाढली.