Air India ची दुर्दशा होण्यास यूपीए सरकार जबाबदार- ज्योतिरादित्य सिंधिया
Jyotiraditya Scindia | (PC: Doordarshan National)

केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी एअर इंडियाचे खासगिकरण करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सांगत, एअर इंडियाची (Air India) दुर्दशा होण्यास यूपीए सरकारच जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या काळात 111 एअरक्राफ्ट खरेदी एवं एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या विलगीकरणानंतरही एअर इंडियाची स्थिती खालावत गेली. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभेत उपस्थित असताना सिंधिया यांनी म्हटले की, यूपीए सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे एअर इंडियाची आर्थिक स्थिती सातत्याने खराब होत गेली. तोटा वाढत गेला. त्यांनी म्हटले की, एअर इंडिया 2005-06 मध्ये 41 ते 15 कोटी रुपये फायद्यामध्ये होती. त्याच्या पुढच्या 14 वर्षांमध्ये कंपनीला 85 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सोनिया गांधी यांचा विरोध आणि काँग्रेस खासदार यांच्या गदारोळानंतरही पलटवार करत सिंधिया यांनी म्हटले की, मी याबाबतीत गप्प होतो. काहीच बोलू इच्छित नव्हतो. मात्र, आपणच माझे तोंड उघडले. आता ऐकूण घेण्याची तयारी ठेवा. त्यांनी म्हटले की, सरकारने हा तोटा कमी करण्यासाठी आणि त्या पैशाचा वापर उज्ज्वला आणि मोफत राशन यांसारख्या जनकल्याणकारी योजनांमध्ये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एअर इंडियाला टाटा करण्यात आला आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: वाढलेल्या महागाईवरुन राहुल गांधीचा सरकारवर हल्लाबोल, पंतप्रधान महागाई वाढुन आपल्याला अच्छे दिन दाखवत आहे)

गुंतवणुकीवरुन काँग्रेसवर पलटवार करत सिंधिया यांनी म्हटले की, जे लोक गुंतवणुकीबद्दल बोलतात. आमच्यावर टीका करतात त्यांनी आपला इतिहासही तपासून पाहिला पाहिजे. काँग्रसवरील टीका कायम ठेवत सिंधिया यांनी म्हटले की, 1991-93 च्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कार्यक्रम सुरु केला होता. जो भारत सरारने नवरत्न , इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम, गेल, एचपीसीएल आणि इतर महत्त्वपूर्ण कंपन्यांना दिला होता. मनमोहन सिंह सरकारच्या आगोदरच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सिंधिया यांनी म्हटले की, 2004 ते 2009 या काळात साडे आठ हजार करोड रुपयांचा निवेश कार्यक्रम या सरकारने सुरु केला होता. जो हिंदुस्तान पेट्रोलियम, एनटीपीसी, पॉवर ग्रिड कॉरपोरेशन आणि भारत पेट्रोलियम यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण कंपन्यांमध्ये सुरु होता.