Rahul Gandhi | (Photo Credit: Twitter/ANI)

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पाच राज्यांमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काँग्रेसने (Congress) पेट्रोल, (Petrol) डिझेल (Diseal) आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ केल्याने मंगळवारी त्यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार हल्लाबोल करत त्यांचा समाचार घेतला आहे. इंधनाच्या किमतींवरील 'लॉकडाऊन' हटवण्यात आले असून सरकार दर सातत्याने 'विकास' करणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले की, गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवरील 'लॉकडाऊन' हटवण्यात आला आहे. आता सरकार दर सातत्याने 'विकास' करणार आहे. पंतप्रधानांना महागाईच्या साथीबद्दल विचारा, ते म्हणतील की थाळी वाजवा. तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, केद्रांवर निशाना साधला आहे. तसेच पंतप्रधान महागाई वाढुन आपल्याला अच्छे दिन दाखवत आहे.

Tweet

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ 

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.  (ह देखील वाचा: India-Australia Summit: ऑस्ट्रेलियाने भारताला परत केल्या 29 मौल्यवान कलाकृती; पंतप्रधान मोदींनी केली पाहणी, Watch Video)

पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये 4 महिन्यांनंतर दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रतिलीटर 80 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. भारताची राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोल प्रतिलीटर 96.21 रूपये आहे तर डिझेल 87.47 रूपये आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई मध्ये इंधन दर हे ₹110.82 प्रतिलीटर पेट्रोल आणि 95 रूपये प्रतिलीटर डिझेल आहे.