UP: धक्कादायक! कोरोनाची लस देण्याऐवजी 3 महिलांना अ‍ॅन्टी रेबीजचे इंजेक्शन दिल्याचा दावा, चौकशीचे आदेश
Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

Uttar Pradesh: सध्या देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असल्याने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येने लसीकरण मोहिम राबवली जात असून त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद ही मिळत आहे. सध्या 45 वर्षावरील सर्वांना कोरोनावरील लसीचे डोस दिले जात आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशातील लसीकरणासंदर्भातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या लसीचा डोस घ्यायला गेलेल्या 3 महिलांना अॅन्टी रेबिजचे इंजेक्शन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी तपासाचे आदेश दिले गेले आहेत.(पीएम नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला COVID19 वर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग, 11 ते 14 एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव साजरा करण्याचे अपील)

शामली जिल्हात ही घटना घडली असून लस दिलेल्या महिलांच्या परिवाराने त्यांना अॅन्टी रेबिजचे इंजेक्शन दिल्याचा दावा केला आहे. या तिन्ही महिला सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. सरोज, अनारकली आणि सत्यावती अशी तीन महिलांची नावे असून त्या कांढला येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथील व्यवस्थापकांनी त्यांच्या हातात अॅन्टी रेबिज लसीची रिसिप्ट दिली. या प्रकाराला महिलांच्या परिवाराकडून तीव्र संपात व्यक्त केला गेला आहे.(Coronavirus Vaccine: लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांना होऊ शकते COVID19 ची लागण, अदर पुनावाला यांनी सांगितले कारण)

या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तर वैद्यकिय कर्मचारी, हेल्थ सेंटरसह इनचार्ज बिजेंद्र सिंह यांची चौकशी केली जाणार आहे. त्याचसोबत दोषीवर कठोर कारवाई केली जाणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.