देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या दरम्यान देशातील विविध राज्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार कोरोनाची पहिल्या लाटेने उच्चांक गाठला असून यंदा ही ग्रोथ रेट यापूर्वी पेक्षा अधिक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. दुसरे म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरातसह अन्य राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटीने उच्चांक गाठला आहे. त्याचसोबत काही राज्ये सुद्धा त्याच दिशेने वळत आहेत. हा आपल्या सर्वांसाठी एक चिंतेचा विषय आहे. आणखी एक महत्वाचे म्हणजे यंदा लोक कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर पणे घेत नाही आहे. त्यामुळेच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.
पीएम मोदी यांनी पुढे असे म्हटले की, एकूण आव्हाने पाहता आपल्याकडे आधीपेक्षा उत्तम अनुभव, संसाधन आणि कोरोनावरील लस सुद्धा आहे. जनतेसह आपले डॉक्टर् आणि हेल्थ केअर स्टाफकडून सुद्धा कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यास मोठा हातभार लागला आहे आणि आता सुद्धा लागतो आहे. तर 'टेस्ट, ट्रॅक, ट्रीट' यांचा वापर कोविड संदर्भात कामे आणि कोविड मॅनेजमेंट या गोष्टींवर अधिक भर दिला पाहिजे.(Coronavirus Vaccination: आता 11 एप्रिलपासून सार्वजनिक आणि खासगी कार्यलयाच्या ठिकाणीही मिळणार कोरोना विषाणू लस; केंद्राने दिले निर्देश, जाणून घ्या काय असेल अट)
येत्या 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. याच दरम्यान आपल्याला लसीकरण उत्सव साजरा केला पाहिजे असे मोदी यांनी सांगितले आहे. या काळात अधिकाधिक कोरोनाचे लसीकरण होईल असा प्रयत्न केला पाहिजे. मी देशातील सर्व तरुण वर्गाला आवाहन करतो की, तुमच्या आजूबाजूला कोणाही 45 वर्षावरील व्यक्ती असल्यास त्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी संभाव्य मदत करावी असे ही मोदी यांनी बैठकीवेळी म्हटले आहे. लसीकरणासह आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, लस घेतल्यानंतर निष्काळीपणाने वागू नये. आपल्याला लोकांना वारंवार हे सांगावे लागणार आहे की, कोरोनावरील लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क घालणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
नाइट कर्फ्यू ऐवजी कोरोना कर्फ्यूचा वापर करा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, आपल्याकडे कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी उत्तम संसाधने आहेत. आपल्याकडे कोरोनावरील लस सुद्धा आहे. आपला जोर आता मायक्रो कंन्टेंटमेंट झोनवर असला पाहिजे. नाइट कर्फ्यू ऐवजी आता कोरोना कर्फ्यूचा वापर करावा जेणेकरुन लोकांमध्ये त्याबद्दल जागृकता राहिल.(खाजगी वाहनांत एकटे असलेल्या व्यक्तीलाही मास्क घालणं बंधनकारक; दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश)
उल्लेखनीय आहे की, गुरुवारी भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 1,26,789 नवे रुग्ण आढल्याने आकडा 1,29,28,574 झाली आहे. तर कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्यांचा आकडा नऊ लाखांच्या पार गेला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश,तमिळनाडू, गुजरात, केरळ आणि पंजाब मध्ये कोविड19 च्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत चालला आहे. देशातील कोरोना संक्रमण झालेल्या 1,26,789 प्रकरणातील 84.21 टक्के प्रकरणे ही या 10 राज्यातील आहेत.