SC On Unnatural Death Of Wife In Matrimonial Home: विवाहितेचा सासरच्या घरात अनैसर्गिक मृत्यू पतीला हुंडाबळीसाठी दोषी ठरवण्यास पुरेसा नाही- सुप्रिम कोर्ट
Court (Image - Pixabay)

विवाहीत महिलेचा सासरच्या घरात विवाहापासून सात वर्षांच्या आत अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू होणे इतकेच कारण तिच्या पतीला हुंडाबळी कायद्याखाली दोषी ठरवण्यास पुरेसे असू शकत नाही, (SC On Unnatural Death Of Wife In Matrimonial Home) असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका खटल्यात दिला आहे. विवाहानंतर सात वर्षांच्या आत विवाहितेचा मृत्यू अनैसर्गिक कारमामुळे होणे हे कलम 304B आणि 498A IPC अंतर्गत आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नसल्याचेही कोर्टाने म्हटले.

भारतीय दंड संहितेच्या कलम 304B (हुंडा मृत्यू), 498A (तिच्यावर अत्याचार करणाऱ्या महिलेच्या पतीचा पती किंवा नातेवाईक), 201 नुसार अपीलकर्त्याची शिक्षा बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एएस ओका आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय खंडपीठाने खटल्यात आपीलकर्त्याची शिक्षा बाजूला ठेवली. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने अपीलकर्त्याला कलम 304B अन्वये 10 वर्षे, कलम 498A अन्वये 2 वर्षे आणि कलम 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे किंवा गुन्हेगाराला खोटी माहिती देणे) आयपीसी अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. जी वरच्या न्यायालयाने कलम 304 अन्वये शिक्षा सात वर्षांवर आणली. (हेही वाचा, HC Refuses Relief To Divorced Woman: एक महिला दोन पती! पुनर्विवाह करणाऱ्या घटस्फोटीत महिलेला हायकोर्टाचा दणका; कारण घ्या जाणून)

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या खटल्यातील जोडप्याचा 1993 मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून हे जोडपे पतीच्या घरात एकमेकांसोबत राहात होते. दरम्यान, 1995 मध्ये पत्नीचे अचानक अनैसर्गिक कारणामुळे निधन झाले. त्यानंतर पत्नीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळीची तक्रार दिली होती. ज्यामुळे पतीवर गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीत मुलीच्या विडिलांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या हुंड्याच्या मागणीची सविस्तर माहिती दिली. वडिलांनी पुढे असा दावा केला की त्यांच्या मुलीला तिचा पती (अपीलकर्ता), भावजय आणि सासू यांनी मारहाण केली आणि तिचा गळा दाबून ठार मारले. तिचा खून केला. इतकेच नव्हे तर तिच्या माहेरच्यांना न सांगता तिच्या मृतदेावर अंत्यसंस्कारही केला.

पोलिसांनी तपासानंतर तिघांवरही (पती, भावजय आणि सासू) आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 304B, 498A आणि 201 अंतर्गत दोषी ठरवले. अपीलमध्ये, उत्तराखंड उच्च न्यायालयाने भावोजी आणि सासू यांना दोषी ठरवून शिक्षा बाजूला ठेवली आणि त्यांना सर्व आरोपातून मुक्त केले. कलम 304B अंतर्गत