Unlock

भारतामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सुरु झाल्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत अनलॉक (Unlock) द्वारे अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने अनलॉक 4 ची (Unlock 4) घोषणा केली आहे. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून नगरविकास मंत्रालय/रेल्वे मंत्रालय 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो गाड्या चालवणार आहे. अनलॉकची घोषणा जरी झाली असली तरी, कोरोना व्हायरस व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे पालन संपूर्ण देशभर केले जाणार असल्याचे केंद्राने सांगितले आहे.

केंद्र सरकरने अनलॉक 4 मध्ये खालील सूचना जारी केल्या आहेत –

    • 30 सप्टेंबरपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन काटेकोरपणे लागू केले जाईल.
    • प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर सुनिश्चित केले जाईल. दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये पुरेसे शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे.
    • राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार, केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय कोणतेही स्थानिक लॉक डाऊन (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी), कंटेनमेंट झोनच्या बाहेर घालणार नाहीत.एएनआय ट्वीट -

  • खालील गोष्टी सोडून इतर सर्व गोष्टी कंटेन्टमेंट झोनच्या बाहेर सुरु असतील.

> सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर (ओपन-एअर थिएटर वगळता) आणि तत्सम ठिकाणे.

> प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास (सरकारच्या परवानगीशिवाय)

एएनआय ट्वीट -

  • शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा व महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी बोलून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ (Containment Zone वगळता) त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल
  • 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संबंधित, करमणुकीशी संबंधित, सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्यास परवानगी दिली जाईल. केवळ 100 लोकांना यात सहभागी होण्याची परवानगी आहे. मात्र मर्यादित संख्येच्या मेळाव्यात देखील, लोकांना फेसमास्क घालणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे अनिवार्य असेल आणि त्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल आणि हँड वॉश आणि सेनिटायझर प्रदान केले जाईल. (हेही वाचा: भारतामध्ये कोरोना व्हायरस चे 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, 1.93 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.88 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर)
  • 21 सप्टेंबर पासुन शाळा व कॉलेज आपल्या शिक्षक व शिक्षकेतर स्टाफला 50 % उपस्थितीसह शाळेत बोलावू शकतात. यावेळी सोशल डिस्टंंसिंग फॉलो करत ऑनलाईन वर्ग घेण्यापासुन ते काउंसिलिंग पर्यंतची कामे करता येतील.
  • आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी/मान्यता/ई-परमिटची आवश्यकता नाही.