Income Tax | Representational Image | (Photo Credits: File Image)

Union Budget 2022:  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणीपूर येथे विधानसभा निवडणूक 2022 पार पडणार असून तत्पूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तसेच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये सुद्धा तेजी पहायला मिळाली. तर अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला आलेली मजबूती आणि लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात काही महत्वांच्या गोष्टींसह टॅक्स कपातीसंदर्भात ही माहिती दिली गेली आहे. याची प्रतिक्षा सर्वच नोकरदारवर्ग आणि उद्योजकांनी होती. या व्यतिरिक्त क्रिप्टो चलनाच्या उत्पन्नावर 30% टक्के कर आकारला जाणार असल्याचे ही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. तर जाणून घ्या निर्मला सीतारमण यांनी टॅक्स संदर्भात केलेल्या महत्वाच्या घोषणांबद्दल अधिक.(Budget 2022 For Farmers: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2.37 लाख कोटी MSP हस्तांतरित करण्यात येणार, जाणून घ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं)

Tweet:

-आता लोकांना दोन वर्षापर्यंत आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करता येणार आहे. परंतु यामध्ये जर काही चुक झाल्यास त्यात सुधारणा ही करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-को-ऑपरेटिव्ह सोसाईटीला आता 14 टक्के MAT भरावा लागणार आहे. एक कोटी ते 10 कोटीपर्यंतचे उत्पन्न असलेल्या सोसायट्यांना फक्त 7 टक्के अधिभार भरावा लागणार आहे.

-दिव्यांग व्यक्तींच्या पालकांना 60 वर्षापर्यंत एन्युटी मिळणार आहे.

-NPS टियर-1 मध्ये आतापर्यंत नियोक्त्याकडून देण्यात आलेल्या योगदानातून फक्त 10 टक्के रक्कमेपर्यंत इन्कम टॅक्समध्ये मिळते. तर आता केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 14 टक्क्यांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे.

-देशात स्टार्टअपला चालना देण्यासाठी सरकारने मार्च 2023 पर्यंत टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. उत्पन्नाची घोषणा न केल्यास सर्च मध्ये सापडलेल्या रक्कमेवर पूर्ण कर भरावा लागेल.

-उद्योगांच्या प्रमोशनसाठी एजेंटला प्रत्येक वर्षाला 20 हजारांहून अधिकच्या गिफ्टवर टॅक्स द्यावा लागणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर 2014 मध्ये मोदी सरकारने इन्कम टॅक्स स्लॅबला 2 लाख रुपयांनी वाढवून 2.5 लाख रुपये केला होता. तर यंदाच्या वर्षत 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब 2.5 लाख रुपये वाढवून 3 लाख रुपये करण्यात आला होता.

वार्षिक उत्पन्न टॅक्स दर नव्या स्लॅबनुसार टॅक्स दर टॅक्स दर जुन्या स्लॅब नुसार टॅक्स दर नव्या स्लॅबच्या हिशोबाने बचत
2,50,000 00% --- --- --- ---
5,00,000 05% -- 05% --- ---
7,50,000 10% 37,500 20% 62,500 25,000
8,00,000 15% 45,000 20% 72,500 27,500
10,00,000 20% 75,000 20% 1,12,500 37,500
12,50,000 20% 1,25,000 30% 1,87,500 62,500
15,00,000 25% 1,87,500 30% 2,62,500 75,000
2,00,00,000 30% 57,37,500 30% 58,12,500 75,000
5,00,00,000 30% 1,47,37,500 30% 1,48,12,500 75,000

अर्थसंकल्पात बदलण्यात आलेल्या टॅक्स स्लॅबनुसार 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही आहे. 2.5 लाख ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने कर लागतो. तसेच इन्कम टॅक्स मधील कायद्यातील सेक्शन 87A अंतर्गत 12,500 रुपयांची सूट मिळते. तर 3 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने कर लावला जातो. Section 87A अंतर्गत 12,500 रुपयांची सूट मिळते.