Union Budget 2020-21: निर्मला सीतारमण यांच्याकडून इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल, रोजगारवृद्धी, महागाई नियंत्रण या 3 गोष्टींबाबत सर्वासामान्यांना अपेक्षा, शेअर चॅटने वर्तवली भविष्यवाणी
Union Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credit: PTI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) उद्या म्हणजेच शनिवारी (1 फेब्रुवारी 2020) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे मोठ्या आशाआकांक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पाकडे पहात आहे. अर्थसंकल्पात त्या देशातील जनतेला कशा आणि कोणत्या पद्धतीने करप्रणालीची भेट देतात याकडे उभ्या देशाच लक्ष आहे. दरम्यान,सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅट (ShareChat) ने देशभरातील सुमारे 60 दशलक्ष मासिक सक्रिय यूजर्सचा डेटा तपासत देशाचा कल जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक सर्वेक्षण केले व त्या आधारे काही भविष्य वर्तवले. डेटा विश्लेषणादरम्यान आढळलेले प्रमुख मुद्दे पाहता आयकर स्लॅबवर पुन्हा कामी करणे, रोजगारामध्ये चालना आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट याबाबत लोकांना विशेष चिंता आणि उत्सुकता असल्याचे पुढे आले.

दरम्यान, शेअरचॅटने एकूण 6 भाषांमधून हा डेटा तपासला आणि त्याचा तपशील प्रसिद्ध केला. या तपशीलानुसार बहुतेक भारतीय लोक आयकर स्लॅबमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री काहीतरी करतील अशी आपेक्षा बाळगून आहेत.तर देशातील रोजगार वाढविण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही मत काही युजर्स व्यक्त करतात. (हेही वाचा, Union Budget 2020: Income Tax कपात, विविध सवलतींसह अर्थसंकल्प २०२० मध्ये केंद्र सरकार विमा क्षेत्राला काय गिफ्ट देणार? जनतेला अपेक्षा)

शेअरचॅट द्वारे संकलित डेटा विश्लेषण

भाषा एकूण व्ह्यूव्ज (लाखोंमध्ये) एकूण एंगेजमेंट व्हॉट्सअॅप शेअर्स वापरकर्त्यांच मत
हिंदी 6 1,00,000 20,000 अ) जीएसटी कमी केला पाहिजे

ब) अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात

c) आयकर दर कमी

तमिळ 2 80,000 22,000 अ) जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढ थांबवा

ब) रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी कृतीची अपेक्षा करणे

c) देशात आर्थिक मंदीसाठी उपाय आवश्यक आहेत.

पंजाबी 2 40,000 12,000 अ) जीएसटी कमी केला पाहिजे

बी) शेती चालना; शेतक to्यांना कर्जमाफी

मराठी 1 23,000 4,000 अ) अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आणि शेतक for्यांसाठीदेखील असावे

ब) आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर अर्थसंकल्पात अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे

क) पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असावे

ड) छोट्या व्यवसाय आणि नोकर्‍याला चालना द्या

ई) मुलींचे शिक्षण आणि सुरक्षा

बंगाली 0.8 15,000 2,300 अ) जीवनावश्यक वस्तूंची घट

ब) प्राप्तिकर स्लॅब वाढवा

कन्नड 1 22,000 1,800 अ) आयकर आणि बँक व्याजदर कमी केले पाहिजेत

ब) अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात

 

केंद्रीय अर्थसंकल्पातून लोक पूर्ततेची अपेक्षा करीत आहेत त्यात जीएसटीमधील कपात, शेतीस चालना देण्यासाठी पुढाकार आणि महिलांच्या वाढीव सुरक्षिततेचा समावेश आहे. 28 जानेवारी 2020 (सकाळी 10 वाजे) ते 30 जानेवारी 2020 (सकाळी 10 वाजेपर्यंत) हा डेटा घेतल्याची माहिती शेअॅचॅटने दिली आहे.. गेल्या दोन दिवसात 80,000 हून अधिक व्हॉट्सअ‍ॅप संदेशांवरील डेटाचे विश्लेषण केले गेले आहे.