ईपीएस (EPS) म्हणजेच कर्मचारी पेन्शन स्किम अंतर्गत कर्मचाऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2020) किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटना गेल्या काही काळापासून पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्पातून पेन्शनधारकांना दिलासा देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. पेन्शनधारकांना सध्या 1 हजार रुपये पेन्शन मिळत असून ती 6 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ईपीएस अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ केल्याच त्याचा लाखो पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत पेन्शनधारकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट देणार आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत पेन्शनधारकांच्या पगारात सुद्धा वाढ होणार आहे. मोदी सरकारच्या या घोषणनेंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसह गुजरात मधील विजय रुपाणी यांचे सरकार सुद्धा महागाई भत्ता वाढवून देण्याची शक्यता आहे. त्यानुसार 5 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. जर गुजरातच्या सरकारने असे केल्यास तर राज्यातील कर्मचाऱ्यांना ही केंद्रीय कर्मचाऱ्यांऐवढा महागाई भत्ता दिला जाईल.(7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शनधारकांना होणार फायदा)
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पगारवाढीची खूषखबर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्यांसाठी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी यासाठी मागणी करत आहेत. सरकारने मागणी मान्य केल्यास 8000 रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. किमान वेतन वाढवण्यासोबतच आता सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.