Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma: उदयनिधी स्टॅलीन पुन्हा आक्रमक, 'राष्ट्रपती अदिवासी, विधवा त्यामुळे नव्या संसद भवन उद्घाटनास निमंत्रण नाही'
Udhayanidhi Stalin | Photo Credit - Facebook)

Udhayanidhi Stalin Controversial Statements: तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके (DMK) नेते उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) पाठीमागील काही दिवसांपासून 'सनातन धर्म' मुद्द्यावरुन जोरदार आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन ते सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाय चढवत आहेत. परिणामी भाजप आणि डिएमके सामना रंगू लागला आहे. आताही त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या एक अदिवासी विधवा आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांना नव्या संसद इमारतीचे (New Parliament Building)उद्घाटन करताना निमंत्रण दिले नाही. अशा प्रकारे निमंत्रण टाळणे यालाच 'सनातन धर्म' (Sanatana Dharma) असे म्हणतात. या टीकेवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'आदिवासी आणि विधवा महिला आहेत म्हणूनच निमंत्रण नाही'

उदयनिधी स्टॅलीन यांनी जोर देत म्हटले आहे की, जवळपास 800 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नव्या संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी देशाच्या प्रथम नागरिक म्हणून विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, सरकारने ते केले नाही. याचे कारण म्हणजे केवळ त्या आदिवासी आणि विधवा महिला आहेत. या गोष्टीतूनच सरकारचा सनातनी विचार कळतो असेही ते म्हणाले. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी तामिळानाडूतील काही लोकांना निमंत्रण पाठवता आले. पण राष्ट्रपती यांना हे निमित्रण देता आले नाही. हाच सनातन धर्म आहे का? जो आम्हाला पुढे चालवा म्हणून सांगितले जाते. ते मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

द्रमुकची स्थापना सनातन निर्मूलनाच्या तत्त्वांवर

'सनातन धर्म' मुद्द्यावरुन सुरुवातीला केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या टीकेबाबत बोलताना उदयनिधी स्टॅलीन म्हणाले, लोकांना माझ्या डोक्यातील विचार माहिती आहेत. त्यामुळे मला त्यांचा मुळीच त्रास होणार नाही. द्रमुकची स्थापना सनातन निर्मूलनाच्या तत्त्वांवर झाली आहे. त्यामळे सनातनी विचारांना आमचा विरोध कायम राहिली. आमचे ध्येय पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही.

उदयनिधी स्टॅलिन परिचय

उदयनिधी स्टॅलिन हे एक एक भारतीय चित्रपट निर्माता, राजकारणी आणि माजी अभिनेता आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी तामिळ फिल्म इंडस्ट्रमध्ये अभिनय केला. दरम्यान, ते राजकारणात आले. त्यांच्याकडे राजकारणाचा मोठा वारसा आहे. त्यांचे आजोबा एम करुनानिधी हे चांगले, लेखक, अभिनेते, निर्माते आणि राजकारणी होते. त्यांचे वडील तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. तर स्वत: उदयनिधी हे तामिळनाडू राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.