Udhayanidhi Stalin Row: 'भाजप म्हणजे विषारी साप', सनातन धर्मावरील वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन पुन्हा आक्रमक
Udhayanidhi Stalin | Photo Credit - Facebook)

Udhayanidhi Stalin On BJP: 'भाजप म्हणजे विषारी साप' असे वक्तव्य करुन तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके (DMK) नेते उदयनिथी स्टॅलीन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या आधी त्यांनी सनातन धर्म (Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma) या मुद्द्यावरुन तीव्र शब्दांत भाष्य केले होते. ज्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. आता नव्या वक्त्यव्यावरुनही नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, मी तामिळनाडूला आमचं घर तर भाजपला विषारी साप मानतो. तर एआयडीएमके (AIADMK) कचरा आहे. जर तुम्हाला सापापासून दूर राहायचे असेल तर AIADMK पासून स्वत:ला दूर ठेवा.

लोकसभा खासदार आणि द्रमुकचे उपसरचिटणीस ए राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केल्यानंतर काही दिवसांनी उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य आले आहे. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, जर एखादा विषारी साप तुमच्या घरात शिरला तर त्याला फक्त फेकून देणं पुरेसे नाही. कारण तो तुमच्या घराजवळील कचऱ्यात लपून बसू शकतो. तुम्ही झाडे साफ करत नाही तोपर्यंत साप तुमच्या घरी परततच राहील," उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले. ते मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे चिरंजीव आहेत.

उदयनिधी स्टॅलिन यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या सनातन धर्माच्या टिप्पणीवरुन चुकीचा अर्थ काढला गेला आहे. आपले वक्तव्य नरसंहाराशी नाहकपणे जोडला गेला. माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला ज्यामध्ये मी नरसंहाराचा दावा केला असे खोटेच पसरविण्यात आले. खरे सांगायचे तर, गेल्या पाच महिन्यांपासून भाजपचे सरकार असलेल्या मणिपूरमध्ये शेकडो लोक मारले गेले, तेथे नरसंहार होत आहे. पण त्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही.