प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशभरात घातलेले थैमान दिवसागणिक वाढत असताना त्यातच एक अत्यंत दिलासादायक माहिती समोर येत आहे, कोरोना व्हायरसच्या विळख्यातून आणखीन एक राज्याची सुटका झाली आहे. हे राज्य म्हणजे त्रिपुरा (Tripura). मुख्यमंत्री बिपलब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्या माहितीनुसार, कोरोनाचे दोन रुग्ण या राज्यात होते. हे कोरोनाचे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनमुक्त झाले आहे. यापूर्वी गोवा (Goa) आणि मणिपूर  (Manipur) या राज्यांनी देखील कोरोनावर मात केली होती. महाराष्ट्र किंवा देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत या राज्यात मोजकीच कोरोना प्रकरणे आढळली होती, मात्र आता कोरोनाच्या रुग्णाची संख्या अगदी शून्यावर आणून या तिन्ही राज्यांनी कोरोनावार मात केली आहे.कोरोना व्हायरसचे ताजे अपडेट जाणुन  घेण्यासाठी क्लिक करा. 

त्रिपुरामधील कोरोनाची पहिली रुग्ण ही गोमती जिल्ह्यातील उदयपूर शहरातील एक महिला होती. लॉकडाउन होण्यापूर्वी ती गुवाहाटीहून परत आली होती आणि 6 एप्रिलला कोरोनाव्हायरस संसर्गाची चाचणी घेण्यात आली होती. 16 एप्रिलला तिच्यावरील उपचार झाले असता तिला विलगीकरणात राहण्यास सांगून डिस्चार्ज देण्यात आला होता.

तर दुसरा रुग्ण हा दुसरा रुग्ण त्रिपुरा स्टेट रायफल्स (टीएसआर) मधील जवान होता. 16 एप्रिल रोजी उत्तर त्रिपुराच्या दामचेरा येथे मध्ये त्याची कोरोना चाचणी झाली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह येताच त्याच्यावर जीबी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले, काल गुरुवारी त्याची पुन्हा कोरोना चाचणी केली असता हे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी याविषयी माहिती देताना, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस दल आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान त्रिपुरा राज्यात आता 111 कोरोनाव्हायरस संशयित व्यक्तींवर पाळत ठेवली गेली आहे आणि 227 जणांना होम क्वारेन्टाईनखाली ठेवले गेले आहे. दुसरीकडे, देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता 23,077 वर पोहचला आहे. मागील 24 तासात, 1684 प्रकरणे आणि 37 मृत्युंची नोंद झाली आहे.