Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

उद्यापासून मॉल सोडून अन्य दुकाने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार पण कोरोनाचे हॉटस्पॉट, कन्टेमेंट झोनमध्ये परवानगी नाही ; 24 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Apr 25, 2020 12:17 AM IST
A+
A-
25 Apr, 00:02 (IST)

उद्यापासून मॉल सोडून अन्य दुकाने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहेत. मात्र कन्टेंमेंट झोन आणि कोरोनाचे हॉटस्पॉट यांना  याममधून वगळण्यात आले आहे.

24 Apr, 23:47 (IST)

मुंबईतील NIA मधील एका सब-इन्स्पेक्टरची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या सब-इन्स्पेक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्वत:हून क्वारंटाइन करावे असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

24 Apr, 23:40 (IST)

मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशी प्रार्थना करतो की आपण सर्व बांधव येणारी ईद कोरोनामुक्त मोकळ्या वातावरण मध्ये साजरी करू असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

24 Apr, 23:34 (IST)

पुण्यात कोरोनामुळे आणखी 5 जणांचा बळी गेल्याने आकडा 68 वर पोहचला आहे.

24 Apr, 23:19 (IST)

एजीव्हीए हेल्थकेअरशी हातमिळवणी करत मारूती मे अखेरीस 10,000 व्हेंटिलेटर पुरवणार.

 

24 Apr, 22:57 (IST)

हिमाचल प्रदेशात 2 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून राज्यातील COVID 19 च्या रुग्णांची संख्या 15 वर पोहचली आहे.

24 Apr, 22:30 (IST)

पश्चिम बंगाल येथील आयटी खारापूर कॅम्पलमध्ये भीषण आग लागल्याने 13 दुकाने जळून खाक झाली आहेत.

24 Apr, 22:08 (IST)

बिहार येथे आणखी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 223 वर पोहचला आहे.

24 Apr, 21:35 (IST)

महाराष्ट्रात केशरी राशन कार्ड धारकांना सरकारचा दिलासा, 8 रुपये प्रति किलोने 3 किलो  गहू तर 12 रुपये किलोने 2 किलो तांदूळ देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 3 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार आहे. 

 

24 Apr, 21:25 (IST)

दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 2514 वर पोहचला तर 53 जणांचा बळी गेला आहे.

Load More

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दिवसागणिक वाढतच असताना आता एक अत्यंत दिलासादायक वृत्त समोर येत आहे, कोरोना व्हायरसच्या विळख्यातून आणखीन एक राज्याची सुटका झाली आहे. हे राज्य म्हणजे त्रिपुरा (Tripura) . मुख्यमंत्री बिपलब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्या माहितीनुसार, कोरोनाचे दोन रुग्ण या राज्यात होते, त्यापैकी पहिला रुग्ण हा काही दिवसांच्या आधीच बरा झाला होता, तर आता दुसऱ्या रुग्णाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाचे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनमुक्त झाले आहे. यापूर्वी गोवा राज्याने कोरोनावर मात केली होती.

दुसरीकडे देशातील कोरोना बाधितांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे, गुरुवारी देशात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 686 झाली आहे, तर एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर पोहचली आहे. आज देशात 1229 नवीन रुग्ण आणि 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या देशात 16689 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व 4325 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 778 नव्या रुग्णांसहित 6427 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 283 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

जागतिक पातळीवर सुद्धा कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, अमेरिकेत मागील 24  तासात 3000 हुन अधिक मृत्यू झाले आहेत. AFP वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, नव्या 3, 176 मृतांच्या आकड्यासोबत अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा हा 50 हजाराच्या पार गेला आहे.


Show Full Article Share Now