Teacher Beating Student: वर्गात शिक्षिकाने केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, धक्कादायक Video समोर
pune Viral Video PC TWITTER

Viral Video: एका महिला शिक्षिकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना पुण्यातील आहे. पुण्यातील शाळेतील एका वर्गात शिक्षिकाने विद्यार्थ्याला हाता पायांनी मारहाण केले आहे. या संतापजनक घटनेनंतर पुण्यातील पोलिस ठाण्यात शिक्षिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- मॉलमध्ये खेळताना झाला मोठा 'गेम', बॉलिंग करताना आईने फोडला टीव्ही

मिळालेल्या माहितीनुसार, वर्गात जेव्हा विद्यार्थी गोंधळ घालत होते त्यावेळी शिक्षिकाने विद्यार्थ्याला शिक्षा दिली होती. त्याला मारहाण केली तर एका विद्यार्थ्याने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. त्यानंंतर सोशल मीडियावर अपलोड केला. या घटनेची माहिती विद्यार्थ्याने पालकांना दिली. पालकांनी विश्रामबाग वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना ३ मार्च रोजी घडली आहे.

ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी विद्यार्थ्याने पालकांना घटनेची माहिती दिली नव्हती. दोन दिवसांने सांगितले त्याने घरात सांगितले की, शिक्षिकाने मारहाण केली.  मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालक जागरूक झाले आणि त्याने शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस ठाण्यात ८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. या धक्कादायक घटनेनंतर अनेक पालकांनी शिक्षिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे. संतप्त पालकांनी शिक्षिकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. पालकांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शाळेने तीन सदस्यीय समिती स्थापन करून चौकशी सुरू केली आहे. समितीने अहवाल दिल्यानंतर शिक्षकावर योग्य ती कारवाई केली जाईल.